Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारचे एक पाऊल पुढे; शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?

शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2025 | 07:18 PM
Purandar: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारचे एक पाऊल पुढे; शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?
Follow Us
Close
Follow Us:

सासवड: पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजवडी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर कित्येक वर्षे अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस विरोध वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सरकार कंबर बांधूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच सप्टेंबर पर्यंत जागेचे भूसंपादन करण्याचे आदेश दिल्यानंतर या कामाने प्रचंड वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणे सहज शक्य व्हावे, यासाठी सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वेस्थानकापासून विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत ही कामे केली जातील. तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यान उरुळी कांचनपर्यंत पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देणे नियोजित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शिक्रापूर ते दौंड हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.

हेही वाचा: Purandar Airport: “जबरदस्ती केली तरी …”; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा

पुणे, पिंपरी-चिंचवड, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. या आराखड्याची तीन टप्प्यांत अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण, पीएमपी सक्षमीकरणाबरोबर बीआरटी मार्गांचे जाळे, तसेच रेल्वे मार्गांमध्येही सुधारणा करण्याचे नियोजित आहे. पुणे, शिवाजीनगर, चिंचवड आणि तळेगाव स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजना त्याअंतर्गत राबविण्यात येणार आहेत.

सातारा रेल्वे मार्गावर प्रस्तावित विमानतळाजवळ जेजुरी आणि राजेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत. त्यातील राजेवाडी हे स्थानक विमानतळापासून जवळ आहे. त्यामुळे राजेवाडी ते विमानतळ या दरम्यान रेल्वेचा स्वतंत्र मार्ग (स्पूर लाइन) विकसित करावा लागेल, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना जाणे-येणे सुलभ होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर बाह्य वळण मार्गाचाही वाहतुकीच्या दृष्टीने योग्य वापर करता येईल, असे या आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पुणे-मिरज मार्गावरील फुरसुंगी स्थानकाचे पॅसेंजर टर्मिनलमध्ये रूपांतर करून ते शिंदवणे येथे स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव आराखड्यात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: पुरंदर विमानतळाला CM फडणवीसांचा ग्रीन सिग्नल; MIDC ला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश, शेतकऱ्यांबाबत काय निर्णय?

विमानतळाकडे जाण्यासाठी रस्ते मार्गांचीही कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे नियोजित आहे. त्यानुसार दिवे घाटमार्गे हडपसर-सासवड, सासवड-बोपदेव, उरुळी कांचन-जेजुरी रस्ता, सासवड-कापूरव्होळ-भोर रस्ता आणि खेड-शिवापूर सासवड लिंक रस्त्या मध्ये सुधारणा करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. एकूणच विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या दृष्टीने सरकारचे हे निर्णय असल्याचे दिसून येत असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात हालचाली होण्याची शक्यात आहे. आता शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना सरकार कशा पद्धतीने करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis government build transport connectivity to purandar airport saswad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • Purandar
  • Purandar Airport
  • Saswad

संबंधित बातम्या

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात
1

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…
2

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत…
3

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत…

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निरा बंद 
4

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निरा बंद 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.