
CM Devendra Fadnavis in satara live 99th akhil marathi sahitya sammelan
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ साहित्याच्या महाकुंभात साहित्यिकांना प्रणाम. स्वराज्याच्या राजधानीत साहित्य संमेलन होत आहे याचा आनंद आहे. आपण सर्वजण साहित्याचे सेवेकरी आहोत. हा इतिहास, विचारांचा अनुभवाचा संगम आहे. हीच आपल्या संस्कृतीची ओळख.” असे फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “साताऱ्याने आतापर्यंत साहित्य संमेलनाला १७ अध्यक्ष दिले. आशय आणि विषय हे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. विचार, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य जोपर्यंत अबाधित आहे, तोपर्यंत संविधानाची गळचेपी कोणीही करू शकत नाही. “
हे देखील वाचा : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. यासाठी आपण खूप संघर्ष केला. जोवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोवर कोणत्याही साहित्यिक संस्थेत हस्तक्षेप होणार नाही. आम्ही मराठीची सेवा करतच राहू. आपल्यालाच सगळे काही समजते या मूर्खांच्या नंदनवनात राहणारा मी नाही. महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो”, असे फडणवीस म्हणाले.
हे देखील वाचा : “मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
साताऱ्यात ग्रंथदिंडीचा उत्साह
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध मौलिक ग्रंथांच्या दिंडीमुळे अवघे शहर साहित्यमय होऊन गेले. पारंपरिक वेशभूषेत, अलोट गर्दीमध्ये साहित्यप्रेमी यात सहभागी झाले. उदंड उत्साहात न्हाऊन निघाले. या अनोख्या शब्द-वारीचा आनंद सर्वांनी मनसोक्त घेतला. ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच साताऱ्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे वैविध्यपूर्ण असे चित्रण दिसून आले. ऐतिहासिक सातारा नगरीतील राजवाडा या ऐतिहासिक स्थानापासून संमेलनस्थळ असणाऱ्या शाहू मैदानपर्यंत ही ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात निघाली. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये लीळाचरित्र, श्री तुकाराम गाथा, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील लिखित ‘महासम्राट’ आणि मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यांचे पूजन करून पालखीने प्रस्थान केले.
आज दिवसभरात