९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले(फोटो-सोशल मीडिया)
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले, ‘आज सातारा जिल्ह्यात साहित्यिकांचा कुंभमेळा भरला आहे. याचा मला खूप आनंद आहे. आजच्या या संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. “
पुढे बोलताना मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले, “अखिल भारतीय साहित्य समेलन साताऱ्यात व्हावे यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालयावर होणारे हे पहिले समेलन आहे. माझे वडील छत्रपती अभयसिंहराजे भोसले हे ६६ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर आज ९९ व्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याची संधी मला प्राप्त झाली.”
“सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाही, लष्करात भरती होणारे तरुण अशी या सातारा जिल्ह्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्याने अनेक साहित्यिक दिले. भाषेसाठी आंदोलन करणारा मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो. सातारा जिल्हा हे सांस्कृतिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असे शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले.
स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत काल, गुरुवारी (दि. १) रोजी राज्य पोलिस बँडच्या निनादात ध्वजारोहण होताच ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा उत्साहात सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ गुरुवारी (दि. १) प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाने झाला. राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सादरीकरणाने साहित्यनगरीतील वातावरण भारावून गेले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.






