Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : “महाराष्ट्राची कहाणी सुरु होते ती देवाच्या पावलांनी”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्रधर्म' या नव्या पॉडकास्टद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेवर प्रकाश टाकणारी नवी मालिका सुरू केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 09, 2025 | 07:21 AM
“महाराष्ट्राची कहाणी सुरु होते ती देवाच्या पावलांनी”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

“महाराष्ट्राची कहाणी सुरु होते ती देवाच्या पावलांनी”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्रधर्म’ या नव्या पॉडकास्टद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेवर प्रकाश टाकणारी नवी मालिका सुरू केली आहे. या पॉडकास्टच्या पहिल्याच भागात त्यांनी रामायण, महाभारत आणि गौतम बुद्धांच्या कालखंडाशी महाराष्ट्राच्या भूमीचा संबंध विशद केला आहे.

Thane News : आधुनिक भात शेतीचं प्रशिक्षण; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भात लागवडीचे प्रात्यक्षिक

फडणवीस यांनी सांगितलं की, “महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर मागे जावं लागेल — अगदी प्रभू रामाच्या वनवासापर्यंत. त्यांनी दंडकारण्यात प्रवेश केला तोच विदर्भ आणि नाशिकचा घनदाट जंगलांचा प्रदेश. पंचवटी, लक्ष्मणरेषा, रावणाचं आगमन, हे सारे प्रसंग या भूमीतच घडले. धर्म-अधर्माचा संघर्ष इथेच उभा राहिला होता.” नाशिकला कुंभमेळ्याच्या तयारीसाठी गेले असताना, या पुरातन इतिहासाचे स्मरण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “राम-रावण युद्ध हे सत्याचा जय कसा होतो याचं प्रतिक आहे,” असं ते म्हणाले.

महाभारतकालीन दाखले देताना फडणवीस म्हणाले की, विदर्भात दमयंतीचा जन्म झाला होता. अर्जुनाने कोकणातील गुहांमध्ये तप करून दिव्यास्त्र प्राप्त केली होती. कृष्णाने रुक्मिणीचे पत्र मिळताच तिच्या मदतीस धाव घेतली — हे सारे प्रसंगही महाराष्ट्राच्या भूमीशी निगडित आहेत. चिखलदऱ्याच्या अरण्यात पांडवांनी अज्ञातवास केला आणि किचकाचा पराभवही इथेच झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंना माजी NSG कमांडोचा सवाल; ’26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तुमचे योद्धे कुठे होते?’

भगवान बुद्धांच्या योगदानाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “बुद्धांच्या विचारांनी महाराष्ट्र केवळ प्रभावित झाला नाही, तर त्यांच्या शिकवणींना कृतीत उतरवले. अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये कोरलेल्या उपासना आणि ध्यानधारणा आजही बोलक्या आहेत. शंकराचार्यांनी चिदानंद रूप शिवोहम या विचाराचा प्रचार करीत करवीरमध्ये पीठ स्थापन केलं. त्यामुळे महाराष्ट्र उत्तर-दक्षिण भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक प्रवाहांना जोडणारा केंद्रबिंदू ठरतो.

फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ या पॉडकास्टच्या या पहिल्या भागातून त्यांनी महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळख नव्या पद्धतीने उलगडली असून, पुढील भागांमध्येही असेच विविध संदर्भ मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Cm devendra fadnavis maharashtra dharm podcast statement lord rama also said this thig about pandharpur wari latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
1

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल
3

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
4

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.