Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडून निधी मंजूर

नाशिकच्या दुष्काळग्रस्त भागातील गावांना ऐन उन्हाळ्यात दिलासा देणारी बाब समोर आली आहे. अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित दमणगंगा- वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2026 | 03:32 PM
Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडून निधी मंजूर
Follow Us
Close
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा;
  • दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडून निधी मंजूर
नाशिक : अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित दमणगंगा- वैतरणा गोदावरी (कडवा-देव) नदीजोड प्रकल्पासाठी शुक्रवारी (दि.६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात १३ हजार ४९७ कोटींची तरतूद केल्याने सिन्नरकरांसाठी हा दिलासा ठरला आहे.

14 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आमदार माणिकराव कोकाटे यांनी या प्रकल्पासाठी अजित पवारांकडे पाठपुरावा केला होता.

अजित पवारांच्या पश्चात या प्रकल्पासाठी निधी मिळणार किंवा नाही याकडे सिन्नरकरांचे डोळे लागले होते. मात्र समुद्राला वाहून जाणारे पश्चिम वहिनी गारगाई, दमणगंगा व वैतरणा नद्यांचे पाणी दमणगंगा उपखोऱ्यातील वाल नदीवर निलमाती, वाघ नदीवर मेट, वैतरणा उपखोऱ्यात पिंजाळ नदीवर कोशिम शेत, गारगाई नदीवर उधळे ही चार धरणे बांधून अडवले जाईल, यातील 20 टक्के पाणी स्थानिक शेतकऱ्यांना देण्याची तरतुद असून उर्वरित पाणी उपसा पध्दतीने वैतरणा धरणात टाकले जाईल. वैतरणा धरणातून कॅनॉल अथवा पाईपलाईनद्वारे पाणी आणून ते कड़वा धरणात टाकले जाईल, कड़वा धरणातून सिन्नर तालुक्यासाठी आरक्षीत असलेले अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने सिन्नरचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटण्यास मदत होणार आहे.

या नदीजोड प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी 5.5  टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यातून सुमारे २० हजार क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत – साधारणतः 5.5 टीएमसी पाणी बोरखिंड येथील प्रस्तावित धरणात कोळवाल नाल्याद्वारे टाकले जाईल, बोरखिंड धरणातून पाईपलाईनद्वारे सोनांबे येथे देवनदीत हे पाणी सोडले जाईल. देवदीत टाकलेले पाणी उच्च तलांक उजव्या कालव्याद्वारे सोनांबे, सौनारी, डुबेरे, पाटोळे, गोंदे, दापूर, नांदूरशिंगोटे पर्यंत नेण्यात येईल. डाव्या कालव्यामार्फत सोनांबे, खापराळे, माळेगाव, ढग्याडोगर, सुळेवाडी, पाटपिंप्री, गुळवंच मार्गे वडांगळीपर्यंत नेण्यात येईल. तसेच खापराळे शिवारातून वडगाव पिंगळा, चिचोली, वडझिरे, नायगाव, जायगाव होणार आहे. हा प्रकल्प वास्तवात येण्यासाठी गेल्या5-6 वर्षापासून आमदार माणिकराव कोकाटे सातत्याने प्रयत्न करत होते.

Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

2024  च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचाळे येथे विकास कामांच्या उ‌द्घाटनाप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार शिवारात पाणी फिरेल. याव्यतिरिक्त देवनदीवर असलेल्या कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव या पूरकालव्यांद्वारे, तसेच देवनदीवर असलेल्या सेकंडक्लास कालव्याद्वारे तालुक्याच्या सर्वच भागांत पोहचणार असून याद्वारे तालुक्यातील जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. तसेच सिन्नर तालुक्यातील दोन्ही औद्योगिक वसाहती, मुंबई-दिल्ली कॉरीडॉर प्रकल्पासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. याचबरोबर औद्योगिक क्षेत्राला दिलेले पाणी रिसायकल करुन सिंचनासाठीसुध्दा उपलब्ध होणार आहे.
यांनी योजनेस मान्यता देण्याचा शब्द सिन्नरकरांना देत तो त्यांनी खरा करुन दाखवला होता. दरम्यान, राज्यशासनाकडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाल्याखेरीज तो पूर्णत्वास जाणे शक्य नव्हते. दादांच्या पश्चात या प्रकल्पाचे काय होणार, या प्रश्नांचे काहूर सिन्नरकरांच्या मनात होते.

या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिम वाहिनी नद्यांचे 7.14 टीएमसी पाणी वळविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथून कार्यान्वित होणार आहे. दमणगंगा उपखोऱ्यातील वाल नदीवर निलमाती वाघ नदीवर मेट, वैतरणा उपखोऱ्यात पिंजाळ नदीवर कोशिम शेत, गारगाई नदीवर उधळे या चार धरणांद्वारे पाणी उचलले जाणार आहे. प्रकल्पातील प्रस्तावित धरणे, वितरण व्यवस्था रोहित्र, उपकेंद्रातील संरक्षण यासाठ एकूण 1280.05 हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे. या योजनेतून तब्बल 17,960  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणान असून औद्योगिक व इतर पाण्याचे शुद्धीकरण करून एकुणे सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे प्रस्तावित आहे.

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

 

Web Title: Government approves rs 13497 crore for damanganga vaitarna godavari dev river linking in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nashik News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…
1

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…

“… माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार”; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ जलयात्रेचा शुभारंभ
2

“… माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार”; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ जलयात्रेचा शुभारंभ

Pune News :  पुण्यात ड्रग्ज सप्लायसाठी ‘पोर्टर’ ॲपचा वापर! 21 लाखांच्या एम.डी. सह तिघांना अटक
3

Pune News : पुण्यात ड्रग्ज सप्लायसाठी ‘पोर्टर’ ॲपचा वापर! 21 लाखांच्या एम.डी. सह तिघांना अटक

Ratnagiri News : रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
4

Ratnagiri News : रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.