मुंबई: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्का-तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. याचा फटका मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महाराष्ट्र्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागू शकते. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या देशाचे राज्याचे लक्ष आता मुख्यमंत्री काय करणार याकडे लागले आहे. मंत्रिमंडळात होणारे फेरबदल हे केवळ भाजपसाठी असे सांगितले जात होते. मात्र मात्र आता ते कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबाबत देखील असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे लवकरच महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. मोठी खांदेपालट होऊ शकते. अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असे सांगितले जात आहे. महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्का तंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौरा केला असून यावेळी त्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुंबई- पुणे प्रवास होणार वेगवान! महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतुक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.’ असे मत त्यांनी व्यक्त केले