Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दूध भेसळ रोखण्यासाठी ‘आयआयटी’च्या सहकार्याने…”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

३ लाख लिटर क्षमतेचा नवीन ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महानंदा परिसरात सिग्नेचर पार्लर आणि अत्याधुनिक इमारत उभारण्यात आल्या आहेत. आरे आणि महानंदा यांच्या ब्रँडचे रिलाँचिंग लवकरच करण्यात येईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2026 | 02:35 AM
“दूध भेसळ रोखण्यासाठी ‘आयआयटी’च्या सहकार्याने…”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
Follow Us
Follow Us:

भेसळ रोखण्यासाठी तयार करण्यात आली टेस्ट स्ट्रीप
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा तयार करण्याचे निर्देश
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली आहे. मात्र, दुधातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व आयआयटी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा तयार करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. या बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, नॅशनल हेवी इंजिनियरिंग कॉपरेटिव्ह लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संतोष थॉमस, एनडीडीबीचे क्षेत्रीय प्रमुख व्ही. श्रीनिवास, विदर्भ मराठवाडा डेअरी विकास प्रकल्प संचालक डॉ. संजय गोरानी, मदर डेअरीचे उप महाव्यवस्थापक गौरव गुप्ता उपस्थित होते.

“जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ‘ग्लोबल…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात सध्या ४० टक्के दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते. तर उर्वरित दूध असंघटीत क्षेत्रातून येत असल्याने भेसळीचे प्रमाण मोठया प्रमाणावर आढळते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत आणण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात ७५ हजार नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्यासोबतच भेसळ रोखण्यास मदत होणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रिप विकसित करण्यात आली असून ही स्ट्रिप यूरिया तसेच इतर भेसळ घटक ओळखण्यास सक्षम असून पुढील सहा महिन्यांत ती पूर्णपणे कार्यान्वित होईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मीनेश शाह म्हणाले की, राज्य शासनाने केलेल्या सहकार्यामुळे महानंदच्या पुनरुज्जीवनाला गती मिळाली असून सुमारे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ३ लाख लिटर क्षमतेचा नवीन ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महानंदा परिसरात सिग्नेचर पार्लर आणि अत्याधुनिक इमारत उभारण्यात आल्या आहेत. आरे आणि महानंदा यांच्या ब्रँडचे रिलाँचिंग लवकरच करण्यात येईल.

Devendra Fadnavis: “लज्जास्पद आणि अशोभनीय”, मल्लिकार्जुन यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबईतील आरे कॉलनीमध्ये कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प तसेच उदगीर येथे महानंदचे नवीन डेअरी प्लांट उभारण्यात येणार आहे. नागपूरमधील बुटीबोरी येथे अत्याधुनिक डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या वतीने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात दुधसंकलन वाढविण्यात येत आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीसाठी केंद्र शासनाच्या एनपीडीडी योजनेअतंर्गत महानंद डेअरीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली असल्याचे मीनेश शाह यांनी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis said ai based system in collaboration with iit to curb milk adulteration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • IIT
  • milk

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
4

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.