'कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही'; या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अन् CM फडणवीसांचा कोणाला इशारा?
कल्याण: सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याने गुंडांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो. असं म्हणत त्यांने मराठी कुटुंबियांना मारहाण केली होती. या घटनेवरून राज्याचं राजकारणही चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केले आहे. या प्रकरणात कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणमधील योगीधाम परिसरातील अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा हाईटसमध्ये राहणारे आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता देवपूजा केल्यानंतर घराच्याबाहेर धूप लावायच्या. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या धरात जायचा. कळवीकट्टे यांच्या घरात लहान मुल आणि वयोवृद्ध आईला धम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे यांनी त्यांना घराबाहेर धूप न लावण्याची विनंती केली होती. पण त्यावरून शुक्ला यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत मुद्दामपणे वाद घालण्यास सुरूवात केली.
हेही वाचा: Kalyan News: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण; आदित्य ठाकरे आक्रमक
हा वाद सुरू असतानाबाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण शुक्लाला याचा राग आल्याने शुक्लाने 10-15 गुंडांना बोलावून देशमुख बंधुंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोन्ही देशमुख बंधू गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक माहिती मिळवली असता या सोसायटीत अखिलेश शुक्ला हे वादग्रस्त व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. शुक्लाने यापूर्वीही अनेक मराठी माणसांना त्रास दिला आहे. शुक्लांविरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
अखिलेश शुकला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणूस अपमानित होईल असे उल्लेख केला आणि त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एमटीडीसीमध्ये शुकला काम करणारा व्यक्ति आहे. त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जे माज करतात त्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणूस कोणत्या काळामध्ये बाहेर गेला हे पहावे लागेल. प्रत्येकाने काय खायचे आणि काय नाही याचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेला आहे. घर नाकारण्याचा कुणाला अधिकार नाही. कुणी यांचा फायदा घेऊन कोणी भेदभाव करणार असेल तर ते मान्य नाही.
मोकळ्या मनाने जनादेश स्वीकारावा – फडणवीस
निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते. मात्र तिथे सिद्ध करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष गेला नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. आम्ही तो लोकसभेत स्वीकारला, त्यावर काम केले. आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटीव्हमुळे आम्ही हरलो.