पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवीला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली. यानंतर संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. मागील सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई केलेली आहे. या घटनेचा संपरून तपास पोलिस करतील.”
“त्रास देऊन जीव द्यायला लावणे हे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही. या प्रकरणात जी कारवाई करता येईल ती आम्ही करू. मकोका कायदा लावण्यासाठी काही नियम असतात. नियमात असेल तर माकोका लावला जेल. पण ते आज सांगता येत नाही. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजेंद्र हगवणे सात दिवस कुठे कुठे फिरला?
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार होते. मागील सात दिवसांपासून हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने दोघानांही ताब्यात घेतले. यासाठी पोलिसांनी सहा टीम्स तयार केल्या होत्या. यानंतर दोघांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी सात दिवस दोघे अलिशान थार गाडीमधून फिरत होते.
सात दिवस काय करत होता राजेंद्र?
मीडिया रिपोर्टनुसार, 17 मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंध हॉस्पिटलला गेला होता. यानंतर तो थार गाडीने मुहूर्त लॉन्सला गेला. त्यानंतर वडगाव मावळ आणि पवना डॅम येथील फार्म हाऊसवर गेला. यानंतर त्याचदिवशी आळंदी येथे लॉजवर गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी पुन्हा एकदा वडगाव मावळ आणि पवना डॅम येथील बंडू फाटक कडे बलेनो गाडीने गेला. 19 मे रोजी त्याने पुणे सोडून सातारा गाठले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर राजेंद्र हगवणे गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
19 मे आणि 20 मे रोजी राजेंद्र हगवणे हा पुण्याच्या बाहेरच होता, 19 मे आणि 20 मे रोजी तो पसरणी मार्गे कोगनोळी येथील हॉटेल हेरीटेज येथे होता. यानंतर त्याने 21 मे रोजी कोगनोळी येथील प्रीतम पाटील या मित्र्याच्या शेतावर मुक्काम केला. यानंतर तो पुण्यात परतला. 22 मे रोजी राजेंद्र हगवणे परत पुण्यामध्ये आला. यानंतर आज (दि.23) रोजी पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला स्वारगेट परिसरातून अटक केली आहे.