Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन  2 – बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात 19 स्टेशन्स असणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 09:30 PM
CM Devendra Fadnavis: 'बीडीडी चाळ' हा प्रकल्प...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

CM Devendra Fadnavis: 'बीडीडी चाळ' हा प्रकल्प...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Follow Us
Close
Follow Us:

विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा 
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार

मुंबई : राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत, हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन  2 – बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात 19 स्टेशन्स असणार आहे. हा मेट्रो प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. याकरिता नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी 15 दिवसात सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. जे प्रकल्प मागे पडले ते वेळेत कसे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चे कामकाज 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण तर वरळी येथील प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. मुंबईतील एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पास अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा 23.8 कि.मी. रस्ता बांधकाम सुरू असून यातील 19 किमीचा रस्ता तयार झाला असून संपूर्ण रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे, ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ

त्याचबरोबर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Web Title: Cm devendra fadnavis suggestion to declare bdd chawl as essential project development work in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ
1

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ

Jobs In Maharashtra: मोठी बातमी! सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना ७०% नोकऱ्या देणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
2

Jobs In Maharashtra: मोठी बातमी! सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना ७०% नोकऱ्या देणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं
3

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

Satara Doctor Death Case: सातारा डॉक्टर प्रकरणात ‘लेडी सिंघम’ची एन्ट्री; ‘या’ IPS अधिकाऱ्याकडे SIT चे नेतृत्व
4

Satara Doctor Death Case: सातारा डॉक्टर प्रकरणात ‘लेडी सिंघम’ची एन्ट्री; ‘या’ IPS अधिकाऱ्याकडे SIT चे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.