Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'फेसलेस आंदोलन' या वक्तव्यालाही प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 05:10 PM
"जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते"; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप

"जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते"; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप

Follow Us
Follow Us:

मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जनंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांना घाबरण्याची गरज नाही. “ज्या विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल झाले आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सोनम वांगचूक प्रकरणावरही व्यक्त केली नाराजी

अमित ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, उपोषण करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करण्याऐवजी त्यांना हटविण्याची पद्धत लोकशाहीला शोभणारी नाही. “संवाद साधला असता तर हा प्रश्न आधीच सुटला असता,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांची भेट घेतल्याचेही सांगितले.

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

“लाडकी बहीण कुठे गेली?” सरकारवर घणाघात

विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा उल्लेख करत अमित ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. “नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थी आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीमार केला जातो. मुलींवरही लाठ्या चालवल्या जात आहेत. निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ची आठवण येते, मग आता प्रश्न विचारणाऱ्या मुलींसाठी ती संवेदनशीलता कुठे गेली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फडणवीसांच्या ‘फेसलेस आंदोलन’ वक्तव्यावर प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला “फेसलेस” म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिले. “ज्यांना तुम्ही फेसलेस म्हणत आहात, त्याच जनतेमुळे सरकार सत्तेत आले आहे. जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते,” असे ते म्हणाले.

अमित ठाकरे यांनी सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याची गरज असल्याचे सांगितले. आंदोलकांना विरोधक किंवा शत्रू समजण्याऐवजी त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचा आवाज दाबण्यापेक्षा संवादातून मार्ग काढणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन

दिल्लीतील आंदोलनावरून वाढले राजकीय आरोप-प्रत्यारोप

जंतर-मंतर येथील आंदोलन आणि त्यावरील पोलिस कारवाईनंतर देशातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. विविध विरोधी पक्षांनी आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचा निषेध केला असून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याची भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रिया आगामी काळातही चर्चेचा विषय राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Amit thackeray on delhi student protest lathicharge neet jantar mantar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • amit thackeray
  • CJP Protest
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती
1

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित
2

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित

Sangli News: दिल्लीतील तिरंगा रॅलीतील तरुणांच्या अटकेचा सांगलीत निषेध; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
3

Sangli News: दिल्लीतील तिरंगा रॅलीतील तरुणांच्या अटकेचा सांगलीत निषेध; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.