शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल; दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 580 अपात्र (बोगस) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत अपात्र मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बनावट नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता याप्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत अपात्र मुख्याध्यापकाच्या नेमणुकीचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बनावट नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी बनावट मुख्याध्यापक प्रकरणाचा तपास करताना त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवत आहेत.
उपसंचालक कार्यालयातील दोघांना अटक
अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत नेले आहे. त्या अनुषंगाने रात्री नागपूर पोलिसांनी अधीक्षक वर्ग दोन, माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील निलेश मेश्राम, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपीक सुरज नाईक या तिघांना अटक केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
दरम्यान, अनेक वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांचे पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करणे, त्यांना बढती मिळवून देणे, बनावट शालार्थ आयडी तयार करण्यासाठी कागदपत्रांची मदत करण्यात निलेश मेश्राम अग्रेसर असल्याची माहिती आहे. आता नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहे.
580 शिक्षक अपात्र
नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 580 अपात्र (बोगस) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधारच निलेश मेश्राम असल्याची चर्चा असून, त्याची जवळपास 50 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचाही आरोप होत आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना रविवारी सदर पोलिसांनी गडचिरोली येथून अटक केली.