Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सतर्कतेचे निर्देश

राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 18, 2025 | 05:34 PM
CM Devendra Fadnavis took review of rain situation at State Disaster Management Centre in the Ministry

CM Devendra Fadnavis took review of rain situation at State Disaster Management Centre in the Ministry

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Rain Update : मुंबई  : संपूर्ण राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले आहे. मुंबईतील जवळपास सर्वच भागांमध्ये रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून चाकरमान्यांपर्यंत सर्वांचे हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक

मुंबईत आज (दि.18) सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Web Title: Cm devendra fadnavis took review of rain situation at state disaster management centre in the ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Maharashtra Rain Updates
  • Monsoon Alert
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
1

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरूच राहणार; नेमकं काय आहे या आस्मानी संकटाचे कारण?
2

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरूच राहणार; नेमकं काय आहे या आस्मानी संकटाचे कारण?

Solapur  Rain Update : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा कहर! बार्शीत एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
3

Solapur  Rain Update : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा कहर! बार्शीत एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

IMD Weather Update: बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; IMD चा भितीदायक इशारा
4

IMD Weather Update: बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; IMD चा भितीदायक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.