विरोध नाही तर पत्रकार परिषद ठाण्यातच का वर्षावर का नाही? सत्ता आणि मुख्यमंत्रिपदाबात शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
महायुती राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून माध्यमांसमोर न आलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद न घेता ठाण्यातील त्यांच्या निवास्थानी घेतली. त्यामुळे अनेत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद आणि सत्ता स्थापनेविषयी महायुतीतील आपली भूमिका आज स्पष्ट केली.
मुख्यमंत्रिपदारसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गेले तीन दिवस मी वर्षा बंगल्यावरच होतो. कुठेही गेलो नव्हतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. माझा सत्ता स्थापनेत कोणताही अडथळा नाही. शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी त्याला समर्थन असेल. त्यात कोणतीही शंका नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. उद्या बैठक होत आहे. त्यावर चर्चा केल्यानंतर आणखी काही निर्णय घेण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? अशा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. ‘भाजप निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. भाजपच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे जवळ जवळ निश्चित झालं आहे.
निवडणुकीतसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले. ‘अडीच वर्षांत महायुतीने जी काही कामं केली त्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडून दिलं. त्यामुळे हा विजय सर्वात मोठा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दादा भुसे, संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते.