Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: ‘व्हीबी- जी राम’जी योजनेत कामांना चालना द्या, जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश; देखरेख समितीची बैठक

Yogesh Kumbhejkar on VB-G RAM G Scheme: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, व्हीबी जी राम जी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत रोजगाराची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 06:59 PM
Yogesh Kumbhejkar on VB-G RAM G Scheme

Yogesh Kumbhejkar on VB-G RAM G Scheme

Follow Us
Follow Us:
  • जिल्हाधिकारी कुंभेजकरांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
  • रोजगार, चारा लागवड आणि जलसंधारणावर भर
  • ग्रामपंचायतीत व्हीबी-जी राम जी योजनेची कामे सुरू करा
वाशिम: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्हीबी जी राम जी योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतीत कामांना चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा दालनात कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील दुष्काळ देखरेख समितीची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी सभागृहात तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी व्हीबी जी रामजी योजनेतून जास्तीत जास्त कामे सुरू होणे आवश्यक आहेत.

Buldhana: महागाईचा आणखी एक झटका! बुलढाण्यात आरओ पाण्याचे दर वाढले; पिण्याच्या पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार

त्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्यावी. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने कार्यवाही करावी. कामे शेल्फवर नाहीत म्हणून चालना मिळाली नाही, असे कुठेही घडता कामा नये. तसे घडल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणांना दिला. कृषी, वन विभाग, मृद व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा आदी विभागांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. अवैध उपसा रोखण्यासाठी दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. ग्रामस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, आपदा मित्र, जलसुरक्षक आणि स्वयंसेवकांना जलस्रोतांवर नियमित देखरेख व गस्त घालण्यासाठी प्रोत्साहित करावे. पाणीबचतीविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. (Washim)

घरगुती पाणी बचतीबाबतही जागृती व्हावी

विशेषतः शिक्षण विभागाने शासकीय व खासगी शाळांच्या माध्यमातून जलदूत नेमावेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरातील पाणी उपलब्धता, वापर असे वॉटर ऑडिट करण्याचे प्रोत्साहन द्यावे जेणेकडून पाणी बचतीचा – संदेश सर्वदूर पोहोचेल, असे निर्देश जिल्हाधिकाायांनी दिले. चारा लागवडीच्या अनुषंगाने बियाणे वाटपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. जलसंधारणाची कामे व चारा लागवडीला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. जलाशयांतील पाणी उपलब्धता, वीजपुरवठा, सार्वजनिक वितरण प्रणाली आदी विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन

Web Title: Washim yogesh kumbhejkar vb g ram g scheme rural employment drought management pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Maharashtra Drought 2026
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
1

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Maharashtra Drought: दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटणार? सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना आता…
3

Maharashtra Drought: दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटणार? सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना आता…

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च
4

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.