
नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर (फोटो सौजन्य-X)
नाशिक : गेल्या ७ दिवसात किमान तापमानात फारसा बदल जाणवत नसून किमान तापमान १० अंशांवर स्थिरावले आहे. किमान तापमान १० अंशापर्यंत घसरल्याने शहरासह जिल्ह्यात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली असून, रविवारी अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण के झाल्याने नागरिकांना उबदार कपड्यांसह की ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या.
७ दिवसात किमान तापमानात फारसा बदल जाणवत नसत किमान तापमान १० अंशांवर स्थिरावले आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडी लांबली होती. परंतु १० न नोव्हेंबरला किमान तापमान १८ अंशावरून घेट १०.८ अंशांवर घसरले. त्यानंतर न थंडीचा जोर जाणवू जाणवत असून थंडीची लाट दिसून येत आहे. दरम्यान न पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु गेल्या ७व दिवसांचे तापमान पाहता किमान तापमान हे १० अंशांवर स्थिरवल्याचे दिसून येत.
अवकाळी पावसामुळे यंदा थंडी लांबली, परिणामी रब्बीचा हंगाम देखील लांबला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांश शेतक-यांवर गव्हाची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांच्या वाढीसाठी थंडी पोषक ठरली असून वेलवर्गीय फळ पिकांना मात्र थंडी मारक ठरण्याची चिन्हे आहे. किमान तापमानाचा पारा आणखी घसरल्यास पिकांच्या वाढीवर आणि फळांवर नकारात्मक परिणाम होणार आहे, विशेषतः दाट धुक्यामुळे पिकांचे नुकसान होऊन मोहोर गळती, परिणामी फळधारणा देखील प्रभावित होते.
निफाड तालुक्यात बंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रविवारी पहाटे तापमान अचानक घसरत तब्बल ८ अंशावर चोहोचले, गहू संशोधन केंद्राने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, हंगामातील है सवांत किमान तापमान ठरले आहे. ईशान्येकडून सतत वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे वातावरणात गारठा आणखी वाढला, तर पहाटे धुक्याची चादर पसरल्याने रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली. जोर इतका वाढला की, शाळकरी मुलांसह कामगार वर्ग व शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेत अक्षरश कुडकुडत प्रधान करावा लागला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोटवांचा आधार घेत नागरिक ऊब मिळवताना दिसले, आरोग्य विभागाने विशेषत नागरिक, लहान मुले आणि दमा-हृदयविकार असलेल्या रुग्णानी उबदार कापावांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस पारा आणखी खाली जाऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Ans: नाशिकचे किमान तापमान १०.३ तर निफाडचे ९.५ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले.
Ans: अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांश शेतक-यांवर गव्हाची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
Ans: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडी लांबली होती. परंतु १० न नोव्हेंबरला किमान तापमान १८ अंशावरून घेट १०.८ अंशांवर घसरले.