Comedian Kunal Kamra posts on how to kill an artist democratically
मुंबई : राज्यामध्ये कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या कवितेवरुन राजकारण तापले आहे. कुणाल कामरा याने अनेक राजकीय नेत्यांवर विडंबनात्मक कविता सादर केल्या आहेत. यामधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर केलेली कविता ही तुफान व्हायरल झाली. कुणाल कामरा याचा स्टुडिओ देखील शिंदेंच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी फोडला असून त्याच्यावर सध्या कारवाई सुरु आहे. मात्र कुणाल कामरा याला पोलिसांनी दोन वेळा समन्स बजावल्या नंतर देखील तो पोलिसांसमोर हजर होत नसल्यामुळे आता त्याच्या प्रेक्षकांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर आता कुणाल कामरा याने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराने केलेलं वक्तव्य योग्य नाही असं म्हणत कारवाईचा इशारा दिला. तर ठाकरे गटाने कुणाल कामराची पाठराखण केली. कुणाल कामराच्या कवितेमध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला. शिंदेंच्या नेत्यांनी तशाच पद्धतीची कविता सादर करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर कुणाल कामरा याने सोशल मीडिया पोस्ट करुन जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकशाही पद्धतीने एखाद्या कलाकाराची क्रमा-क्रमाने कशी हत्या करायची ?
हे सगळं केलं की कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे आपला आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचं बाहुलं व्हायचं किंवा दुसरा पर्याय शांत बसायचं. मी सांगतोय हे एखादं प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आशयाची पोस्ट कुणाल कामरा याने केली आहे. यामध्ये त्याने आपली परखड मतं मांडली आहेत. सोशल मीडियावर कामराच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. कुणाल कामराने वादग्रस्त कवितेच्या प्रकरणावरुन मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याला न्यायालयाने दिलासा देत अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. दरम्यान कुणाल कामराने जो वाद झाला त्यावरुन माफी मागणार नाही अशी भूमिका आधीच घेतली आहे.