
Complaint filed against Anjali Bharti in Mira Bhayandar for controversial statement on amruta fadnavis
गायिका अंजली भारती यांनी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणी आणि कथित आक्षेपार्ह कृत्याच्या निषेधार्थ भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. या प्रकरणाचे पडसाद मीरा-भाईंदरमध्ये उमटले असून, भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भोईर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कनकिया पोलीस ठाण्यात जाऊन अंजली भारती यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
हे देखील वाचा: बुद्धीची कीव करावी तितकी कमी…! अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या गायिकेवर चित्रा वाघ संतापल्या
समाजमाध्यमे किंवा सार्वजनिक व्यासपीठावर महिलांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वैशाली भोईर म्हणाल्या, “समाजात द्वेष पसरवणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अंजली भारती यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी.” असे मत वैशाली भोईर यांनी व्यक्त केले.
भाजपचा आक्रमक पवित्रा
या संदर्भात भाजप जिल्हा मीडिया प्रभारी बिपिन गुप्ता यांनी सांगितले की, “हे प्रकरण केवळ तक्रारीपुरते मर्यादित राहणार नाही. मीरा-भाईंदर भाजप हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही.” यावेळी भाजप महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हे देखील वाचा : गायिका अंजली वाघची जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान
काय म्हणाल्या गायिका अंजली वाघ?
समाजात दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला जात आहे. त्यांना फाशी द्या फाशी द्या अशी मागणी केली जात आहे. पण हे सरकार फाशी कशी देणार? हे मोदी सरकार बलात्कारीला फाशी देईल का? मी तर म्हणतो त्या बलात्कार करणाऱ्यांना सांगतो की कोण्या दोन वर्षाच्या पोरीवर, कोण्या माई-बहिणीवर बलात्कार करण्यापेक्षा या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्याची बायको माल बनवून फिरत असते. त्याच्या बायकोवर बलात्कार करावा, असे गंभीर स्वरुपाचे भाष्य गायिका अंजली वाघ यांनी केले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.