
Singer Anjali Wagh makes controversial statement about Amruta Fadnavis marathi news
कवालीकार अंजली भारती यांनी भंडाऱ्याच्या फुलमोगरायेथे 14 जानेवारीला झालेल्या भीम मेळावा दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. याचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हायरल झाला आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेली ही टिप्पणी सोशल मीडियावर झपाट्याने पसरली असून त्यावर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
हे देखील वाचा : यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी
काय म्हणाल्या गायिका अंजली भारती?
त्या म्हणाल्या की, “समाजात दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला जात आहे. त्यांना फाशी द्या फाशी द्या अशी मागणी केली जात आहे. पण हे सरकार फाशी कशी देणार? हे मोदी सरकार बलात्कारीला फाशी देईल का? मी तर म्हणतो त्या बलात्कार करणाऱ्यांना सांगतो की कोण्या दोन वर्षाच्या पोरीवर, कोण्या माई-बहिणीवर बलात्कार करण्यापेक्षा या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्याची बायको माल बनवून फिरत असते. त्याच्या बायकोवर बलात्कार करावा, असे गंभीर स्वरुपाचे भाष्य गायिका अंजली भारती यांनी केले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
हे देखील वाचा : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती
गायिकेच्या वक्तव्याचा ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल अतिशय गलिच्छ भाषेत अंजली भारती गायिका यांनी जे वक्तव्य केलेला आहे त्या वक्तव्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडी कडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करते, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी निषेध केला आहे.