चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन गायिका अंजली भारतीवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हि़डिओ शेअर करुन अंजली भारतीवर जोरदार टीकास्त्र डागले. चित्रा वाघ म्हणाल्या की, अंजली भारती नावाच्या बाईचा आताच एक व्हिडीओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा.. अशी चिथावणी देणं.. ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे. अशी भाषा मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्याने कोणी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे.
हे देखील वाचा : गायिका अंजली वाघची जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे.पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये,” असा इशारा देखील आमदार चित्रा वाघ यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती
याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन अंजली भारतीवर टीका केली आहे. त्या म्हणल्या की, “सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस
यांच्या बद्दल अतिशय गलिच्छ भाषेत अंजली भारती गायिका यांनी जे वक्तव्य केलेला आहे त्या वक्तव्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडी कडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करते,” अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी निषेध केला आहे.






