मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्याविषयी आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सत्तार यांनी चोवीस तासाच्या आत सुप्रिया सुळे यांची माफी मागावी तसेच सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मुंबईतील फोर्ट पोलीस स्टेशनमध्ये प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी तक्रार दाखल केली आहे. सत्तार यांनी माफी मागवी तसेच यांना मंत्रिंडळातून गच्छंती करा अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते (NCP) व पदाधिकारी करत आहेत.
[read_also content=”अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, विद्या चव्हाण यांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/abdul-sattar-should-be-apologise-and-say-sorry-to-supriya-sule-demand-from-vidya-chavan-342591.html”]
तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घरी व ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करत आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत, सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारत, प्रतिमेचं दहन करण्यात आलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. त्यामुळं आम्ही आज फोर्टमधील एमआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, तसेच सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.