Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हैदराबाद गॅझेट’मधील कागदपत्रांद्वारे मराठा-कुणबी नोंदीचीं तपासणी पूर्ण करा! मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी ‘हैदराबाद गॅझेट’मधून कागदपत्राद्वारे नोंदी तपासाव्यात आणि कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण  उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी आज दिले.

  • By नारायण परब
Updated On: Jul 24, 2024 | 07:23 PM
‘हैदराबाद गॅझेट’मधील कागदपत्रांद्वारे मराठा-कुणबी नोंदीचीं तपासणी पूर्ण करा! मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
Follow Us
Follow Us:

राज्यात मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘हैदराबाद गॅझेट’मधील नोंदी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक हैदराबाद येथे पाठविले. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने  केली आहे. या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण  उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात मराठा समाज आरक्षण व संबंधीत विषयांबाबत बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव सुवर्णा केवल आदी उपस्थित होते.

“प्रमाणपत्राचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा “

मंत्री श्री. शंभुराजे देसाई  म्हणाले की, राज्यात मागील काळात शासनाने मराठा – कुणबी नोंदी पडताळणी साठी युद्धपातळीवर सर्वेक्षण पूर्ण केले. यामध्ये आढळलेल्या नोंदीनुसार मराठा – कुणबी प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना देण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणात नोंदी न आढळल्यामुळे प्रमाणपत्र देण्यास अडचण आली. हैदराबाद गॅझेटमधील जास्तीच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करावे. सगे- सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. या छाननीचे कामही अंतिमस्तरापर्यंत नेण्यात यावे. न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना मंत्री श्री. देसाई यांनी आज दिल्या.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत लवकर कार्यवाही करा

मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले विविध गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही करावी. यामध्ये 31 जानेवारी 2024 पूर्वी दाखल गुन्ह्यावर दोषारोपपत्र झालेल्या प्रकरणांमध्ये गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. तसेच 31 जानेवारी 2024 नंतर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत नवीन शासन निर्णय काढण्याची कारवाई करावी, असे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

Web Title: Complete the work of maratha kunbi records check through documents in hyderabad gazette directives of minister shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • Kunbi
  • Maratha Reservation
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात, विखे पाटलांचे कौतुक; पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी शंका
1

कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात, विखे पाटलांचे कौतुक; पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी शंका

Bhiwandi:  विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर आठवलेंचे मोठे विधान
2

Bhiwandi: विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर आठवलेंचे मोठे विधान

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
3

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

Maratha Reservation वर दादा भुसे यांचे वक्तव्य, “सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील”
4

Maratha Reservation वर दादा भुसे यांचे वक्तव्य, “सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.