देहूरोड येथे गुरुद्वारा मार्गे मेन बाजारपेठेतील सुभाष चौकामध्ये दुचाकी रॅली आल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. जगताप आणि शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारत जोडो याच्या समर्थनात मनोगत व्यक्त करण्यात आले व जनजागृती करत काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर भाजी मंडई, वृंदावन चौक मार्गे दुचाकी रॅली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयाच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.