प्रियांका गांधी यांच्या रोड शो त काँग्रेस-भाजप आमने-सामने; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गडचिरोतील सभेला संबोधित केल्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान रोड शो सुरू असताना बडकस चौकात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानं घोषणाबाजी झाली. गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियांका गांधी यांचा रोड शोची बडकस चौकात सांगता झाली. यावेळी हा प्रकार घडला. प्रियांका गांधी यांचा रोड शो संघाच्या मुख्यालयाजवळ येणार याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील तयारीत होते. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील बडकस चौकात जमले होते.
दरम्या दोन्ही मोठ्या पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी चौकाच्या मधोमध एका ट्रक वर उभे राहून भाषणाला सुरुवात केली. देण्यास सुरुवात केली. बंटी शेळके यांनी त्यांच्या हातात तिरंगा घेत कार्यकर्त्यांना तुम्हाला तीन रंगाचा झेंडा पाहिजे की दोन रंगांचा झेंडा पाहिजे असा सवाल केला.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वादावर पडता
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते समोरा समोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण वाढलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडून रोड शो वेगानं पुढं नेण्यासाठी प्रयत्न सुरू होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. एसीपी अनिता मोरे यांच्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. मात्र अखेर वाद निवळला.