Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कथित रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला वाहनतळाचे कंत्राट, फेरविचार करण्याची काँग्रेसची मागणी

शहरात प्रति एक किमी वाहनांची संख्या ०१ हजार ९०० आहे. ही देशाची राजधानी दिल्लीपेक्षा पाचपट जास्त आहे. २०१४ पासून मुंबईत वाहनांची संख्या १४ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत वाहनांची संख्या २५.४६ लाख होती.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 09, 2022 | 08:44 PM
कथित रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला वाहनतळाचे कंत्राट, फेरविचार करण्याची काँग्रेसची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मुंबई महापलिकेतील घोटाळ्यामुळे सध्या कॅगची चौकशी सुरू असताना रस्ते घोटाळ्यामध्ये काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंत्राटदाराला चक्क वाहनतळाचे कंत्राट देण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा महापलिका विरोधी पक्षांच्या कचाट्यात सापडली आहे . निविदा प्रक्रियेत रेलकॉन कंपनी पात्र ठरली आहे. या निविदा प्रक्रियेला काँग्रेसने आक्षेप घेतला असून कंत्राटदाराच्या नियुक्तीपूर्वी निविदेचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

शहरात प्रति एक किमी वाहनांची संख्या ०१ हजार ९०० आहे. ही देशाची राजधानी दिल्लीपेक्षा पाचपट जास्त आहे. २०१४ पासून मुंबईत वाहनांची संख्या १४ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत वाहनांची संख्या २५.४६ लाख होती. २०२० मध्ये वाहनांची संख्या ४० लाखांवर गेली होती. २०२२ मध्ये वाहनांच्या संख्येत ०४ लाखांनी वाढ होऊन हा आकडा ४४ लाखावर पोहचला आहे. वाढत्या वाहनांसोबत पार्किंगचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने यांत्रिकी वाहनतळ (शटल व रोबोपार्क सिस्टीम) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाच्या बाहेरील मोकळ्या जागेत पहिल्या टप्प्यातील हे यांत्रिक वाहनतळ उभारण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये रेलकॉन इन्फाप्रोजेक्ट ही कंपनी पात्र ठरली आहे. या निविदेमध्ये आर. के. मधानी आणि कंपनी, क्वालिटी हाईटकॉन, रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट, एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर आणि सी.ई इन्फ्रा इंडिया या कंपन्यांनी भाग घेतला होता. रेलकॉन या कंपनीला रस्ते कामाचा अनुभव आहे. या कंपनीने यांत्रिक वाहनतळ उभारणीचे काम केलेले नाही. त्यामुळे ज्या कंपनीला रोबोटिक वाहनतळ उभारणीचे ज्ञान नाही, अशा कंपनीला वाहनतळाचे सुमारे १०० कोटी रुपयांचे कंत्राट देणे योग्य नसल्याचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे वाहन पार्किंगचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Congress demands reconsideration of parking contract to alleged road scam contractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 08:44 PM

Topics:  

  • BMC
  • Congress Demands
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका
1

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी ! राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; राज्य तंत्रज्ञान विभागाचा धाडसी निर्णय
2

मोठी बातमी ! राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; राज्य तंत्रज्ञान विभागाचा धाडसी निर्णय

मुंबई महापालिकेत ‘दगडी चाळी’चा दबदबा? ‘डॅडीं’ची लेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
3

मुंबई महापालिकेत ‘दगडी चाळी’चा दबदबा? ‘डॅडीं’ची लेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
4

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.