Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची अफलातून कामगिरी. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या या नवदुर्गेचा प्रवास आणि काम आपण या लेखातून जाणून घेऊया. नक्की काय आहे त्यांचे काम?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 27, 2025 | 01:55 PM
शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांचे काम

शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांचे काम

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई/नीता परबः आदिशक्तीचा जागर  सध्या चालू  आहे. आपली संस्कृती ही स्त्रीत्वाचा सन्मान करते. अशाच मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या नेतृत्वाची धुरा लिलया पेलणाऱ्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे. शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी अवघ्या काही महिन्यातच  शिक्षण  विभागात स्वत:चा ठसा उमटवला  आहे. १९९७ साली महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून सुरुवात केल्यानंतर या शिक्षकवृंदाचा शिक्षक होण्याचा त्यांचा प्रवास आव्हानात्मक हाेता, हा प्रवास यशस्वी करत १८ फेब्रुवारी २०२५ मध्ये  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व १ सष्टेबर २०२५ मध्ये प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) असे टप्पे पार केले.

पालिका प्रशासनाच्या अंतर्गत मराठी, गुजराती, इंग्रजी, तमिळ, हिंदी, तेलुगु, उर्दू, कन्नड अशा विविध माध्यमांच्या शाळा कार्यरत  आहेत.  याशिवाय एसएससी, सीबीएससी, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई अशा राज्य आणि केंद्रीय मंडळाच्या शाळा मुंबई मनपा चालवते.  तसेच मनपाच्या १११८ व खाजगी प्राथमिक १०५५ शाळा, लाखो विद्यार्थी व  शिक्षकांचे विविध प्रश्न साेडविण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असताे. ज्यामुळे  त्यांनी स्वत:चा  आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे आणि उत्तम करिअर घडवले आहे. 

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांची रेलचेल

शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील ही मनपा शाळेत शिकणारी मुलं आज सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. एफएलएन कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता विकास, गणित गुरुवार सारखे उपक्रम याशिवाय दहावीचा उत्कृष्ट निकाल तसेच  दादर वूलन मिल  आयसीएसई  मंडळ १००% निकाल, पूनम नगर सीबीएसई मंडळ निकाल ८७%, शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी इयत्तेच्या १२३४ आणि आठवी इयत्तेच्या ९७२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चमकदार कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. या उल्लेखनीय कार्यात सुजाता खरे यांचा माेलाचा सहभाग आहे.  इयत्ता ६वी ते ८ वी विद्यार्थ्यांसाठी गणितीय क्रिया उपक्रम, इयत्ता ९ वी १० विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक शिक्षणाचे कौशल्य केंद्र, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी एप्रिल मध्येच पाठ्यपुस्तक वाटप, ‘एक पेड माँ के नाम’, असे विविध उपक्रम सध्या त्या सचाेटीने राबवित आहेत.  

पुराने सोडले MPSC वर पाणी! राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, या तारखेला होणार परीक्षा

शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा

बीएमसी शाळा यात २ शाळांची निवड, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ व २ एकूण ५ शाळांची निवड झाली ही  शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे,  क्रीडा, सहशालेय उपक्रम अशा सर्वच बाबतीत मुंबई मनपाची मुलं उल्लेखनीय भूमिका वठवत आहेत. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाला २७ वस्तू, पोषण आहाराची जोड दिल्याने मनपा शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. पालकांच्या विश्वासाला  मनपा शिक्षण विभाग पुरेपूर न्याय देत असल्याचे शिक्षणाधिकारी सुजाता खरे अभिमानाने सांगतात.

शिक्षणाचे बाळकडू आई-वडिलांकडून

शाळांना आवर्जून भेट देणे, विद्यार्थ्यांबराेबर संवाद साधत त्यांच्यात रमायला आवडते. शिक्षणाचे हे बाळकडू मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले आहे. आई गृहिणी आणि वडील सहायक केंद्रीय तपास अधिकारी (वर्ग १) म्हणून निवृत्त. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचारवारसा त्या यथाशक्ती जगत असल्याचे सुजाता खरे सांगतात.

अभ्यासासाेबतच  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव  मिळणे महत्वाचे

येत्या काही महिन्यात पथनाट्य स्पर्धा,  बालकोत्सव स्पर्धा पिकनिक (४थी व ७वी विद्यार्थ्यांसाठी) शिष्यवृत्ती परीक्षा,  संगीत सप्ताह – संगीत विभाग सेवा सप्ताह, चित्रकला स्पर्धा  गडकिल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इंद्रधनुष्य २०२५, छायाचित्रण कार्यशाळा आणि स्पर्धा – कला अकादमी महापौर आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२५  आदी स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सुजाता खरे सांगतात.

IPS Success Story: सोडली डॉलर्सवाली नोकरी! देशसेवेची वेडापायी पूजा झाली IPS

Web Title: Brihanmumbai municipal corporation education officer sujata khare s alchemy has left a unique mark on education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • BMC
  • education news

संबंधित बातम्या

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता
1

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी
2

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा
4

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.