मुंबई : राज्यातील हवामानात सारखा बदल (Maharashtra Bhushan award) होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना अचानक पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम आज भर उन्हात पार पडला. पण याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. तसेच काही लोकांचा यात मृत्यू झाल्याने महाराष्ट्र कॉंग्रेसने हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे
यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल… — Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) April 16, 2023
कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया : आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
भर उन्हात कार्यक्रम घेतल्याने अनेकांचा मृत्यू :
यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली जात आहे. तसेच यामध्ये जवळपास 300 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्यने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा यावेळी मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यातच कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाही लोकांनी या कार्यक्रमला हजेरी लावली होती. मात्र, आता याच कार्यक्रमात घडलेल्या प्रसंगाविषयी माहिती येत आहे.
वेगवेगळ्या ४ रुग्णालयांत रुग्णांना दाखल :
कार्यक्रमतात तीव्र उष्णतेमुळे काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली जात आहे तर यामध्ये जवळपास 300 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.