मराठ्यांचा इतिहास इतका गौरवशाली आहे की तो एका राज्यापूर्ती मर्यादित नाही. मराठ्यांनी तामिळनाडूच्या तंजावरपासून ते पाक-अफगाणच्या वेशीवर असणाऱ्या अटकेपर्यंत राज्य केले आहे. या इतक्या विशाल मराठा साम्रज्यात अनेक संस्कृती अतिशय गुण्या गोविंदाने नांदत होते. अशावेळी मराठीचा जगभर प्रसार होत असताना, मराठी पाककलेने स्थानिक पाककलेशी जोड घेऊन नवीन पाक रचना तयार केली.
महाराष्ट्रीय मूळ असणारे प्रसिद्ध भारतीय खाद्य पदार्थ. (फोटो सौजन्य - Social Media)
सांभार त्यापैकी एक! सांभार हे नाव आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाशी सलंग्न आहे. राजे तंजावूरच्या भोसले घराण्यातील शाहाजी भोसले यांच्या भेटीला आले असता त्यांच्या जेवनाखातीर महाराष्ट्रात बनवल्या जाणाऱ्या आमटीसारखा प्रकार बनवण्यात आला.
ती आमटी जरी असली तरी तिला तंजावुरचा स्पर्श होता. त्यातून एक नवीन पाकरचना तयार झाली आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले. आज त्या खाद्यपदार्थाला 'सांबार' या नावाने ओळखले जाते.
महाराष्ट्रामध्ये वर्षोनुवर्षे खाल्ला जाणारा नाश्ता म्हणजे 'कांदे पोहे'! हेच कांदे पोहे आता मध्य प्रदेशची ओळख बनले आहेत. याचे सर्वस्वी श्रेया तेथील मराठा राजवंशांना जाते.
मध्यप्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या कांदे पोहांवर शेव टाकण्याची प्रथा सुरु झाली. सांबार दक्षिण भारताची ओळख बनले आहे तर कांदे पोहांचे काही प्रकार मध्य प्रदेश आणि परिसराची. पण सत्य हेच की या खाद्य पदार्थांचा निर्माता एक मराठी माणूसच होता.
आजच्या घडीला महाराष्ट्रातील वडापाव, मिसळपाव तसेच पावभाजीसारखे खाद्य पदार्थ जरी राज्याच्या बाहेरही मोठ्या संख्येने विकले जात असले तरी त्यांना महाराष्ट्राची ओळखच समजले जाते.