Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भवती महिला मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; फडणवीसांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून, संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2025 | 06:26 PM
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; फडणवीसांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Follow Us:

मुंबई : पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून, संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे, जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा, असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बाळं आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर आहे.

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Congress has become aggressive over the death of a pregnant woman nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • Congress
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.