Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्षवाढीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; आता थेट मुलाखतीद्वारे तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

राज्यभरातील काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2025 | 12:05 PM
पक्षवाढीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; आता थेट मुलाखतीद्वारे तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

पक्षवाढीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; आता थेट मुलाखतीद्वारे तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

पक्षात तळागाळात काम करणाऱ्या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून महत्वांच्या पदांवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत नवे चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे, असं कार्यकर्ते म्हणाले.

पक्ष निरिक्षकांनी जिल्ह्यांचे दौरे करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निवड समितीच्या मुलाखतींनंतर या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निवड समितीत ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदींचा समावेश आहे.

ही निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कार्यक्षमतेवर आधारित असून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आली आहे.

यामध्ये अकोला – ८, बुलढाणा – १९ , चंद्रपूर – २, जळगाव – ८, सिंधुदुर्ग – १, उल्हासनगर – १, रत्नागिरी – ६, ठाणे शहर – ३, ठाणे ग्रामीण – ५, अहिल्यानगर – ३, सांगली – २, पुणे – २, सोलापूर – १, अमरावती – २, धाराशिव – १, जालना – ७, हिंगोली – २, छत्रपती संभाजीनगर – ६, बीड – ३, यवतमाळ – १ अशा नियुक्त्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित नियुक्त्यांही लवकरच केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Congress is appointing taluka presidents through direct interviews

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Congress
  • congress nana patole
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती
1

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती

भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
2

भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम
3

पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश
4

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.