पुणे: काँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्या नंतर अखेर संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. येत्या मंगळवारी ( २२ एप्रिल) ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, असं थोपटे यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे. संग्राम थोपटे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये प्रवेश कऱणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना संग्राम थोपटे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद एक वर्षाहून अधिक काळ रिक्त राहिलं. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण सेवाज्येष्ठतेचा विचार करून पक्षनेतृत्त्वाने निर्णय घेतले. पण आता कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. सलग तीनवेळा मोठ्या शक्तींच्या विरोधात निवडून येऊनसुद्धा तुम्हाला राजकीय ताकद दिली जात नाही, परिणामी विकासकामांनाही खोडा लागत आहे. त्यामुळे आता आपल्याला बदलाचा निर्णय घेतला पाहिजे, असं कार्यकर्त्यांच म्हणण आहे. आपल्याला डावललं जात आहे. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पण शेवटी तालुक्याचं भवितव्याचा विचार करून आम्ही हा निर्णय़ घेतला आहे.
Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! भर लग्नादिवशी तरुणीने मामाच्या घरी संपवलं आयुष्य
मी कुणाच्याही दबावाला बळी पडलो नाही. भोर तालुक्यात लोकसभा निवडणुकीवेळी दिवसरात्र शिवसेनेसाठी काम केलं. हे काम करून आम्ही उपकार केले असं नाही. पण आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला.मध्यंतरी मला, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी मला दिली होती. मी जवळपास १ महिना तिथे यंत्रणा घेऊन काम केलं. पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काम केलं. तुम्ही तिथले रिझल्टही पाहिले. मी दबावाखाली निर्णय घेतला नाही.. एकनिष्ठतेने जर तुम्ही राहात असाल पण त्यानंतरही तुम्हाला जबाबदारी मिळत नसेल, त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका बदलत गेली, असं थोपटे यांनी सांगितलं.
संग्राम थोपटे म्हणाले, ” भाजपमध्ये जाण्याचा निर्णय़ का घेतला, यावर बोलताना थोपटे म्हणाले, भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात आणि राज्यातही मोठं संख्याबळ असेलला पक्ष आहे. त्यामुळे मतदारसंगातील विकासकामांना गती मिळण्यासाठी भाजप हा सर्वात चांगला पर्याय आहे, अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही हे पाऊल उचचलं आहे. मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा गोष्ट वेगळी होती. पण मी तीनही टर्म निवडून येऊनसुद्धा मला म्हणावी अशी ताकद दिली गेली नाही. या काळात हे काम झालं नाही. माझा व्यक्तिगत आरोप नाही. पण आमचा निर्णय झाला आहे. १५ वर्ष एक प्रतिनिधी तीन वेळा निवडून येतो. लोकांनीही संधी दिली होती. जर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवायची होती. ती ताकद मला दिली असती तर आज चित्र वेगळं असतं. बऱ्यादा आम्ही भूमिका मांडली पण आमचा विचार केला गेला नाही.
मला काही मिळावं अशी माझी अपेक्षा नाही. त्या अपेक्षेने मी जात नाही. पण पक्षश्रेष्ठी माझ्या गुणवत्तेनुसार मला काय द्यायचं ते ठरवतील. असंही थोपटे यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाराजी एकमद वाढत नाही.”