भाजपचे उमेदवार जाहीर करताना माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीत कोणाला उमेदवारी द्यायची किंवा बसवायचे याचे सर्व निर्णय संग्राम थोपटे एकहाती घेत असत.
Baramati: भोर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर स्थानिक स्तरावरील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना थांबण्याचे आवाहन केले होते. आता परिस्थिती बिकटआहे. तुमच्यासारख्या नेत्यांची काँग्रेसला गरज आहे.त्यामुळे आपण विचार करावा, अशी विनंतीही सपकाळ य़ांनी थोपटे यांना केली.