बीड पुन्हा हादरलं! भर लग्नादिवशी तरुणीने मामाच्या घरी संपवलं आयुष्य
लग्नाच्याच दिवशी बीडमध्ये एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून या तरुणीने मामाच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज २० एप्रिल रोजी तरुणी विवाहबंधनात अडकणार होती. मात्र, लग्नाच्या दिवशीच तिने टोकाचं पाऊल उचलंत आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक कदम याला अटक केली होती. मात्र, त्याला लगेच जामिन मिळाल्याची माहिती आहे.
Kolhapur Crime : उसाच्या शेतात गांजाची झाडे; पोलिसांनी छापा टाकून केली मोठी कारवाई
सरपंच संतोष देशमुख प्रकरणापासून बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देशमुख हत्या प्रकरणानंतर गुन्हेगारीची कितीतरी प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून लग्नादिवशीच तरूणीने आत्महत्या केली. त्यामुळे बीडमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान अंबादास दानवे यांनी, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये. कोणाचाही मुलाहिजा बाळगू नये. मुलींची छेडछाड केली असेल तर पोलिासांनी कठोर कारवाई करावी, असं म्हटलं आहे.
अभिषेक कदमसह १०-१२ मुलांची टोळी आहे. ही टोळीतील गुंड मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात, त्यांचे फोटो काढतात अन् ब्लॅकमेल करतात. यामध्ये दोन मुलींचाही आहे. अभिषेक कदम याच्यावर मकोका लावावा अन् कायमचा जेलमध्ये टाकावा, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली आहे.