Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काँग्रेसला महिला सन्मान शिकवण्याची गरज नाही; लोंढेंचा भाजपवर निशाणा

सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 01:46 PM
'त्या' ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काँग्रेसला महिला सन्मान शिकवण्याची गरज नाही; लोंढेंचा भाजपवर निशाणा

'त्या' ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काँग्रेसला महिला सन्मान शिकवण्याची गरज नाही; लोंढेंचा भाजपवर निशाणा

Follow Us
Follow Us:

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता. राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्या संदर्भामध्ये जो शब्द वापरलेला होता त्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून ते ट्विट होते, व्यक्तिपरत्वे नव्हते. पण काही लोकांकडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या मुद्द्याचा वापर करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की,  काँग्रेस पक्ष, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्त्री दाक्षिण्य सर्वोपरि मानणारे आहेत, स्त्रीचा सन्मान हे आमच्यासाठी सर्वोपरि आहे. बीडच्या पत्रकार परिषदेत कोणाचे वागणे कसे होते, पत्रकारांना कसे प्रश्न विचारू दिले नाहीत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उत्तरे देऊ दिली नाहीत हे सर्वांनी पाहिले आहे, ते ट्विट त्या अनुषंगाने होते. तरीपण ज्या पद्धतीच्या हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्या, ते लक्षात घेऊन ट्विट डिलीट करण्यात आले. स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटर हँडलवरून त्या संदर्भात खेद सुद्धा व्यक्त करत ते ट्विट चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे सांगितले आहे. त्यानंतरही जे काही सुरू आहे, ते केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे, ही भाजपाची प्रवृत्ती आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेत बोगस भरतीचे रॅकेट, कंत्राटी कामगारांना कायम करा; मनसेची मागणी

भाजपाची विचारसरणी मनुस्मृती माननारी आहे, जी स्त्रीला दुय्यम स्थान देते, स्त्रीला कुठेही सन्मान देत नाही. एका ट्विटवरून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपाच्या पाठिंब्याने सुरु असून महाराष्ट्राच्या राजकारणाला ते धरून नाही. अजित पवार हे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानणारे, स्त्रीला महत्त्व देणारे, त्यांचा सन्मान करणारे होते, त्यांच्या पश्चात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाचे अनुकरण केले जात आहे ते योग्य नाही, असे अतुल लोंढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा  : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

पवारांवरील टीकेचे संजय राऊतांकडून समर्थन

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील या टिकेचे समर्थन करत नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. ‘गुंगी गुडिया’ हा काही असंसदीय शब्द नाही आणि राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवारांनी टीका सहन करायलाच हवी, असे रोखठोक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. गेल्या वर्षभरात बीडमधील वाढत्या गुन्हेगारच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवारांनी बाळगलेल्या मौनामुळे काँग्रेसने ते ट्वीट केले होते, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांच्याजागी फडणवीस आणि शिंदे असते तर त्यांनाही गुंगा-गुड्डा म्हटलं असतं’ असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

Web Title: Congress leader atul londhe has criticized the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • Congress
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
2

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
3

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
4

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.