Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

भाजपने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने ओळखावी आणि ही विषवल्ली आता कापल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 11:51 AM
भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली
  • निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा
  • हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
मुंबई : भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने ओळखावी आणि ही विषवल्ली आता कापल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. सोलापूरात एका उमेदवाराचा खुन झाला, अकोट व खालापूरमध्ये खून झाले. राज्यातील अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्यात आले, त्याचीच प्रचिती नांदेड मध्येही आली. विशेष म्हणजे हे सगळे उमेदवार विरोधी पक्षातीलच आहेत, जे आज सत्तेत बसलेल्या गुंड, मवाल्यांच्या भ्रष्टयुतीला भिडण्याची हिंमत दाखवताहेत. ते लढताहेत हीच त्यांची चुक आहे का ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, असे सपकाळ म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले. ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक निवडून दिले, २००० ठिकाणी दुसऱ्या नंबरवर आले. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जनतेने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मतदान करा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात गोंधळ! मतदार यादीतून मराठी माणसांची नावचं गायब, काय आहे नेमकं प्रकरणं?

अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी : नाना पटोले

वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized bjp and chief minister fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • BJP
  • Harshvardhan Sapkal
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
1

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले
2

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?
3

खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?

भाजपचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन
4

भाजपचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.