Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारचे कुटील कारस्थान उघड, PM मोदींनी देशाची माफी मागावी; कॉंग्रेसच्या नेत्याची मागणी

३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 03:42 PM
सरकारचे कुटील कारस्थान उघड, PM मोदींनी देशाची माफी मागावी; कॉंग्रेसच्या नेत्याची मागणी

सरकारचे कुटील कारस्थान उघड, PM मोदींनी देशाची माफी मागावी; कॉंग्रेसच्या नेत्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • सरकारचे कुटील कारस्थान उघड
  • PM मोदींनी देशाची माफी मागावी
  • कॉंग्रेसच्या नेत्याची मागणी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध हा देशाच्या प्रगतीस अडथळा असल्याचे म्हटले. यावरुन आता काँग्रेसनेही मोदींच्या संबोधनानंतर जोरदार हल्लाबोल केला आहे. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

सपकाळ म्हणाले, महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुर्नरचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. काँग्रेसने जनधन-आधार-मोबाईल (JAM) आणि जीएसटीला विरोध केला हा पंतप्रधानांचा दावा म्हणजे त्यांच्या खोटारडेपणाचे उत्तम उदाहरण आहे. २९ सप्टेंबर २०१० रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथून आधारचा शुभारंभ पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह व सोनिया गांधी यांनी केला होता. GST सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने पुढे नेला होता; मात्र त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदींनीच GST ला विरोध केला होता.

पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, पंतप्रधानांनी माता भगिणींची माफी मागण्यापेक्षा आता लागलीच महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे. महिला आरक्षणाचा कायदा नारी शक्ती वंदना तर सप्टेंबर २०२३ मध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने मंजूर झालेला आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड झाले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा प्रयत्न करून तमाम महिलांची फसवणूक केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : “विमान अपघाताच्या अखेरच्या क्षणीही दादांच्या…”; जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी

पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा

पंतप्रधानांनी केवळ काँग्रेसच नव्हे तर तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम आणि समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांवरही निशाणा साधला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या या पक्षांवर त्यांनी महिलांविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. ज्यावेळी महिलांच्या अधिकारांवर गदा येईल त्यावेळी त्याचा बदला घेतला जाईल. नारीशक्ती वंदन विधेयकाला ज्या लोकांनी विरोध केला, त्यांनी महिलांना गृहीत धरण्याची चूक केली. देशातील महिलांना विरोधकांची भूमिका समजली आहे. त्याचे परिणाम भोगावा लागणार, असं मोदी म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized prime minister narendra modi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी
1

महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी

PM Modi Live: “महिलांच्या स्वप्नांचा ज्यांनी चक्काचूर केला त्यांना….”; महिला आरक्षणावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
2

PM Modi Live: “महिलांच्या स्वप्नांचा ज्यांनी चक्काचूर केला त्यांना….”; महिला आरक्षणावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?
3

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ; पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ
4

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ; पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.