Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी

Political News : महिला आरक्षण विधेयक आणि मतदार पुर्नरचना या विधेयकाला नामंजूरी मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांनी काँग्रेसविरोधात आंदोलन छेडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 19, 2026 | 01:36 PM
Protest against Congress in Hingoli following the rejection of the Women Reservation Bill

Protest against Congress in Hingoli following the rejection of the Women Reservation Bill

Follow Us
Follow Us:

Hingoli Political News : हिंगोली : संसदेत नारी शक्ती वंदन महिला विधेयक मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे शहरात काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात थाळी बजाव आंदोलन करत काँग्रेसविरोधात (Congress) जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक विशाल गोटरे, कपिल खंडेलवाल, मनोज बांगर, संजय राठोड, अनिल देव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हिंगोली नगराध्यक्षा रेखा बांगर, कळमनुरी नगराध्यक्ष आश्लेषा चौधरी, महिला जिल्हा प्रमुख रेखा देवकते, ज्योती वाघमारे, सुवर्णा गाभणे, सारिका चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत शिवसेना गटाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे देखील वाचा : “TMC ला जास्त महिला खासदार नको होत्या…; महिला आरक्षणावरुन PM मोदींचा विश्वासघाताचा आरोप

केवळ सरकारला विरोध
मात्र, या विधेयकाला काँग्रेसने विरोध दर्शविल्याने हा केवळ राजकीय विरोध नसून मातृशक्तीचा अपमान असल्याचा गंभीर आरोप कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. ते म्हणाले की, “देशातील महिलांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे पाऊल होते. अशा वेळी विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे होय. काँग्रेसने केवळ सरकारला विरोध करण्यासाठी हा निर्णय घेतला असून, महिलांच्या सन्मानाचा विचार केला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

हे देखील वाचा : राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; मेळाव्याआधीच संघटनेत भगदाड

हा देशातील मातृशक्तीचा अपमान – आमदार संतोष बांगर

आंदोलना दरम्यान महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने महिलांना राजकीय प्रतिनिधित्वात समान संधी मिळावी यासाठी विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षण विधेयक मांडले होते.

लोकसभेमध्ये विधेयक नामंजूर

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यावर सखोल चर्चा करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. शुक्रवारी लोकसभेत तीन विधेयकांवर मतदान घेण्यात आले विशेषतः ‘संविधान (१३१ वे) सुधारणा विधेयक, २०२६’ वर. या विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर विरोधात २३० मते पडली. तथापि, हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी, सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण खासदारांपैकी (MPs) दोन-तृतीयांश खासदारांच्या मतांची आवश्यकता होती. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, कोणत्याही संविधान सुधारणा विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला असून याचे पडसाद देशभर पडले आहे.

Web Title: Protest against congress in hingoli following the rejection of the women reservation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Congress
  • Hingoli News
  • political news
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!
1

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
2

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप
4

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.