Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 01:26 PM
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे. रा. स्व. संघ व भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवायचे आहे. मागील १२ वर्षापासून संविधान व लोकशाही पायदळी तुडवली जात आहे आणि याविरोधात आपल्याला खंबीरपणे लढायचे आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला १०० वर्षे झाली तरी अद्याप या संघटनेची नोंदणी केलेली नाही, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नाही, आणि जी संघटना समाजात विष कालवते, त्या संघटनेचे गुणगान एक आयपीएस अधिकारी गातो, त्या संघटनेला चांगली संघटना म्हणतो, हे अत्यंत गंभीर आहे. देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन करत हर्षवर्धन सपकाळ यांनी अनिरुद्ध वनकर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

हे सुद्धा वाचा : पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

यावेळी बोलताना अनिरुद्ध वनकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता, तो संविधान संपवण्यासाठी होता. भारतीय जनता पक्ष व रा. स्व. संघाला देशात मनुवाद आणायचा आहे, भाजपा संघाचा हा कुटील डाव लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओळखला आणि हातात संविधान घेऊन लोकसभा निवडणुकीत देशभर रान पेटवले व भाजपाचा डाव हाणून पाडला पण हा धोका संपलेला नाही. देशाचे संविधान धोक्यात आहे हे ओळखून काम करा, एसआयआर मधून दलित, अल्पसंख्याक समाजाची नावे वगळली जात आहेत, त्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही वनकर यांनी केले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the rss and the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.