Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळांची टीका

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2026 | 11:25 AM
पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळांची टीका

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून, महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, राजन भोसले, राजेश शर्मा तसेच वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन सपकाळ यांनी राज्याच्या पुरोगामी वारशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेली ही भूमी, वारकरी संप्रदायाने दिलेली समतेची शिकवण आणि आपल्या मायबोली मराठीचा अभिमान या सर्वांची जपणूक करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रात समाजात फूट पाडण्याचे, जाती-धर्मांत भांडण लावण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची ओळख आणि अस्मिता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे महत्त्व कमी करण्याचे कारस्थान सुरु आहे. डी-लिमिटेशनसारख्या प्रक्रियांद्वारे महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा वरवर दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताला धक्का देणारे निर्णय घेतले जात आहेत.

मिसिंग लिंकच्या नावाखाली राजकारण केले जात आहे; पण प्रत्यक्षात कायदा-सुव्यवस्था, प्रशासन, महिलांची सुरक्षा, दुष्काळ व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाई या सगळ्याच ठिकाणी ‘मिसिंग लिंक’ दिसते. सरकारने आत्मपरीक्षण करून ही तूट भरून काढावी

बच्चू कडू यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, बच्चू कडू यांच्या फोन प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. मात्र सत्य समोर आणण्याऐवजी सरकार गप्प बसलेले दिसत आहे.

महाविकास आघाडीतील संबंधांबाबत सपकाळ म्हणाले, आमचे गठबंधन भक्कम आहे. ‘एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या भावनेने आम्ही पुढे जात आहोत. आगामी काळात संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस नेतृत्वाची भूमिका बजावेल. राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मोठी शक्ती आहे, आणि राज्यात काँग्रेसला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, ही आमची भूमिका आहे, ज्याला सहयोगी पक्षांनीही मान्यता दिली आहे.

हे सुद्धा वाचा : भाईंदरमध्ये RTO ची धडक कारवाई! ५६५ रिक्षाचालक मराठीत नापास; ३,४४३ रिक्षांची केली तपासणी

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
1

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा
2

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार
3

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

भाजपाची ‘वन नेशन, वन पार्टी’कडे वाटलाच, विधान परिषद निकाल म्हणजे ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार – हर्षवर्धन सपकाळ
4

भाजपाची ‘वन नेशन, वन पार्टी’कडे वाटलाच, विधान परिषद निकाल म्हणजे ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार – हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.