(फोटो सौजन्य: Pinterest)
राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक
बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने
दरम्यान, मराठी न येणाऱ्या चालकांना बॅज, परमिट व लायसन्स कशाच्या आधारे देण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परवाने मिळत असल्याची चर्चा असताना आरटीओ प्रशासनाने मात्र तपासणीत कोणतेही बोगस बैंज, परमिट किंवा लायसन्स आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दोषीवर कठोर कारवाईची मागणी
या सर्व प्रकारामुळे रिक्षा बेंज, परमिट व लायसन्स बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळविण्यात आल्याची शक्यता बळावली आहे. माहिती अधिकारातून – मिळालेल्या कागदपत्रामध्ये खाडाखोड करून एकाच – नोंदणी क्रमांकाचे अनेक जन्मदाखले तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या – प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई – करावी तसेच संशयित बॅज, परमिट व लायसन्स – तातडीने रद्द करावेत, अशी मागणी समाजसेवक निलेश फापाळे यांनी केली आहे.
अनेकांकडे एकाच क्रमांकाचे जन्मदाखले
रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य असून, राज्यातील किमान १५ वर्षाच्या वास्तव्याचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड व वीजबिल सादर करणे आवश्यक असते. मात्र, अनेक चालकांनी एकाच नोंदणी क्रमांकाचे जन्मदाखले सादर करून बेकायदेशीररीत्या वास्तव्याचे दाखले मिळवल्याचे समोर आले आहे. हे दाखले भाईंदर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातून नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






