Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा अशी, मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 02:38 PM
‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा अशी, मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते पण मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा केला, त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. नितीन गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहनं बंद पडली, इथेनॉलची वकिली करणारी व्यक्ती नितीन गडकरीच आहेत तसेच या घोटाळ्यात अनेक दलालही आहेत, त्यांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! तब्बल 7 वाहनांना उडवले; घटना CCTV मध्ये कैद 

RSS चा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस दिल्लीला!

देवेंद्र फडणवीस यांच्याबदद्ल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरु आहे, आणि त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झालेली आहे. हिंदी लादण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग होता. महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह आहेत, फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत. भाजपा आरएसएसलाही त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी रेशीम बागेचा खास माणूस हवा आहे व ते फडणवीस आहेत. मनुस्मृतीतील श्लोक टाकणे, चार्तुवर्ण व्यवस्था पुन्हा आणणे, संविधान व शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी फडणवीस हेच योग्य व्यक्ती आहेत, म्हणून दिल्लीत त्यांना शिक्षणमंत्री बनवण्याचा घाट घातला जात आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded nitin gadkaris resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.