Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2026 | 04:32 PM
एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत असतात. रा. स्व. संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकापासून रा. स्व. संघाच्या कार्यालयावर संयुक्त धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी संघ मुख्यालय परिसरात धडकले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आल्याने पंतप्रधान अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. याच दबावाखाली नरेंद्र मोदींनी व्यापार करार करून भारताला गुलाम बनवले आहे. देशातून सिलेंडर आणि संसदेतून नरेंद्र गायब झाले आहेत. इंधन गॅस तुडवड्यावर मोदी काहीच बोलत नाहीत, देश म्हणून एकत्र भूमिका घेताना दिसत नाहीत. एपस्टिन फाईलमध्ये नाव आले तरीही काहीच कारवाई होत नाही. गेंड्याचा कातडीचे व बेशरमपणाचे लक्षण आहे. एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची भूमिका एकच असल्याने आम्ही संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चा काढणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचा पोलिसांवर दबाव आहे. संघ कार्यालयावर मोर्चा काढल्याने भाजपाची देशभरात नाचक्की होईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली तरी आमचा निर्धार व मागण्या कायम आहेत. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

…तेंव्हा फडणवीस झोपा काढत होते का?

नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण आपणच बाहेर काढले अशा फुशारक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मारत आहेत. मुख्यमंत्र्याच्या प्रत्येक शब्दात अहंकार ठासून भरलेला दिसतो. फक्त मलाच ज्ञान, बुद्धी आहे असा त्यांचा समज असून, इतर सर्वांना ते मुर्ख समजतात. मुळात एपस्टीन फाईल्सवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशोक खरात फाईल उघडण्याचा त्यांचा कांगावा असावा. भोंदू अशोक खरात प्रकरण होऊच कसे दिले? मागील पाच वर्षाच्या काळात फडणवीसच गृहमंत्री होते, त्यावेळी फडणवीस झोपा काढत होते का? हे त्यांचे अपयश आहे, हे त्यांनी मान्य करावे. प्रकरण अंगलट झाल्याने रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, चाकणकर यांना कशाचाही पश्चाताप झालेला नाही व नौतिकतेच्या आधारेही त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मोर्चापूर्वी संविधान चौकातील सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे संविधान व तिरंगा झेंडा रा. स्व. संघाला देणार होतो पण सरसंघचालक मोहन भागत हे मोर्चाला व संविधानाला घाबरून दिल्लीला निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी निवृत्ती घ्यावी असे बौद्धिक त्यांना देण्यात आले पण मोदींने ते मानले नाही, याचा अर्थ नरेंद्र मोदी संघाला घाबरत नाहीत, ते सैराट झाले आहेत. संघात नैतिकता राहिलेली नाही हे यातून दिसत आहे. भाजपा व संघाला देशातून संविधान संपवून बंच ऑफ थॉट लादायचे आहे. संघ व भाजपाला संविधान मान्य नाही. सर्व यंत्रणा सरकारने खिशात घातल्या आहेत. भाजपा व संघाला मनुवादी, हुकूमशाही व्यवस्था आणायची आहे. हा देश अदानी-अंबानीच्या हाती द्यायचा डाव आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded the resignation of prime minister narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान
1

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
2

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती
3

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड
4

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.