Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत

सोशल मीडियावरून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तींची बदनामी करण्याच्या वाढत्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या बदनामीला लगाम लावण्यासाठी कडक धोरण स्विकारले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 13, 2026 | 12:30 AM
सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत

सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सोशल मीडियावरून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तींची बदनामी करण्याच्या वाढत्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या बदनामीला लगाम लावण्यासाठी कडक धोरण स्विकारले आहे. हे रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून पोलिस महासंचालक असणार आहेत. सोशल मीडियावरील बदनामी, दिशाभूल करणारे मजकूर आणि गैरवापर रोखण्यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करणे अथवा स्वतंत्र कायदा तयार करण्याच्या शक्यतेचा अभ्यास ही समिती करणार आहे.

 

तंत्रज्ञान आणि आधुनिक युगात प्रत्येकजन सोशल मिडीयावर आहे. पण, त्याचा अतिरेक देखील पाहिला मिळत आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावरून वैयक्तिक तसेच सामाजिक स्तरावर बदनामीकारक पोस्ट, अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. या घटनांमध्ये वाढ होत असल्याची नोंद शासनाने घेतली आहे. विशेषतः आयटी ॲक्टमधील कलम ६६-अ रद्द झाल्यानंतर अशा प्रकरणांमध्ये प्रभावी कारवाई करताना अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अधिक सक्षम आणि प्रभावी कायदेशीर चौकट उभी करण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू केला आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर पुढील ३ महिन्यांच्या आत समितीला आपला सविस्तर अहवाल गृह विभागाकडे सादर करावा लागणार आहे. या अहवालाच्या आधारे सोशल मीडियावरील बदनामीकारक व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन उपाययोजना लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफवा व बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर लगाम लागणार आहे.

सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यास आवश्यक कायदेशीर सुधारणा सुचवणे, स्वतंत्र राज्यस्तरीय कायद्याची आवश्यकता तपासणे, सर्वोच्च न्यायालयाने श्रेया सिंघल व पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज प्रकरणांत दिलेल्या निर्देशांचा अभ्यास करणे, तसेच तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पडताळणी करणे अशी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. विशेषतः महिला व प्रतिष्ठित व्यक्तींविरोधातील बदनामीच्या घटनांमध्ये तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : ‘अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार’; महसूलमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

समितीची रचना

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत विधी व न्याय विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश केला असून, सायबर विभागाचे अपर पोलिस महासंचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. गरजेनुसार विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना समितीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्याचा अधिकारही समितीला देण्यात आला आहे.

Web Title: The state government has formed a high level committee to stop defamation on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Police News
  • Social Media

संबंधित बातम्या

Maharashtra Police Housing: पोलीस दलासाठी मोठी बातमी! ५,४५९ घरांसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

Maharashtra Police Housing: पोलीस दलासाठी मोठी बातमी! ५,४५९ घरांसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
2

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई
3

पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, घरखर्चाचा ताळमेळ बसेना; दरवाढीमुळे नागरिक हवालदिल
4

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, घरखर्चाचा ताळमेळ बसेना; दरवाढीमुळे नागरिक हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.