Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं? गृहमंत्रालयाने खुलासा करावा; सपकाळांची मागणी

सावरी गावातील कारवाईबाबत गृहमंत्रालयाने खुलासा करावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2025 | 05:38 PM
सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं? गृहमंत्रालयाने खुलासा करावा; सपकाळांची मागणी

सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं? गृहमंत्रालयाने खुलासा करावा; सपकाळांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं?
  • गृहमंत्रालयाने खुलासा करावा
  • हर्षवर्धन सपकाळांची मागणी
मुंबई : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने छापा टाकला आहे. पण या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या कारवाईत नेमके काय सापडले? असा प्रश्न विचारून गृहमंत्रालयाने यावर खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सपकाळ म्हणाले की, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने ९ डिसेंबरला दोन अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते मेफेड्रॉन पुण्यातील विशाल मोरे या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. मुंबई पोलीसांनी विशाल मोरेला पकडण्यासाठी सापळा रचला. मेफेड्रोन खरेदी करायचे आहे असे सांगून १२ डिसेंबरला विशाल मोरेला पिंपरी चिंचवडच्या हद्दीत दोन किलो मेफेड्रोनसह पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात तो मेफेड्रोन तयार करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीसांनी सावरी गावात धाड टाकली असता तिथे एका गुरांच्या गोठ्यात शेड उभारुन मेफेड्रोन तयार करणे सुरु होते. ती जागा गोविंद शिमकर नावाच्या बामणोलीत व्यक्तीची असून, ओंकार दिघे या सावरीत राहणाऱ्या व्यक्तीमार्फत मोरेला भाड्याने दिली होती. पोलीसांनी तिथूनच तीन कामगारांना अटक केली, जे पश्चीम बंगालचे आहेत.

सपकाळ पुढे म्हणाले की, सावरी गावातील गोठ्यात मेफेड्रोन तयार करणाऱ्या तीन बंगाली कामगारांना ओंकार दिघे हा गावातील तेजस लॉजमधून जेवण आणून देत होता. सावरी गावातील हे तेजस लॉज ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. दिड महिन्यांपूर्वी हे लॉज सुरु झाले असून प्रकाश शिंदेंनी ते दरे गावातील रणजीत शिंदे याला चालवायला दिले होते. सावरी गावात ज्या जागेवर छापा टाकण्यात आला ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची? तिथे ड्रग्सची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना? जादूटोणा सुरु आहे? की आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकही तातडीने तिथे पोहचले. त्यांना तिथे काय आढळून आले? या संपूर्ण प्रकरणाची माहिती दडवून सरकार नेमके काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे? या प्रकरणी संशय बळावत असून, गृह विभागाने खुलासा करावा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made a big demand to the home minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Satara Police

संबंधित बातम्या

CM Devedra Fadnavis : शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्या :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devedra Fadnavis : शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्या :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवीन नियम तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी
2

लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवीन नियम तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
3

धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

मावळ तालुक्यात लेडीज डान्सबार खुलेआम सुरु; मध्यरात्रीपर्यंत लाखोंची उधळण
4

मावळ तालुक्यात लेडीज डान्सबार खुलेआम सुरु; मध्यरात्रीपर्यंत लाखोंची उधळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.