Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला आरक्षणासाठी राजीव गांधी अन् सोनिया गांधींचे मोठे योगदान, महिला आरक्षण उपकार नाही तर…; सपकाळांनी ठणकावून सांगितलं

महिला आरक्षण उपकार नाही तर हक्क आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 11:47 AM
महिला आरक्षणासाठी राजीव गांधी अन् सोनिया गांधींचे मोठे योगदान, महिला आरक्षण उपकार नाही तर...; सपकाळांनी ठणकावून सांगितलं

महिला आरक्षणासाठी राजीव गांधी अन् सोनिया गांधींचे मोठे योगदान, महिला आरक्षण उपकार नाही तर...; सपकाळांनी ठणकावून सांगितलं

Follow Us
Follow Us:

मुंबई : महिला आरक्षणाचा पाया १९८५ साली मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात स्व. राजीव गांधी यांनी घातला आणि यातूनच पुढे पंचायत राज प्रणाली आणली. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू केले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. पुढे सोनिया गांधी यांनी महिला आरक्षणासाठी पुढाकार घेतला परंतु महिला आरक्षण आणताना त्याला कडाडून विरोध भाजपाने केला होता. महिलांचे स्थान केवळ ‘चूल आणि मुल’, आहे असा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत महिला आरक्षण उपकार नाही तर हक्क आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

 

‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’ने काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन मध्ये महिला आरक्षणावर जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मनुस्मृती व गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट मध्ये महिलांना स्थान नाही पण संविधानाने मात्र महिलांना हक्क व अधिकार दिलेले आहेत. स्त्री पुरुष समानतेचा धागा संविधानात आहे आणि संविधानानेच महिलांना मतदानाचा हक्क दिला आहे. संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष भेदभाव संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर भाजपा व संघाच्या विचाराला समता व बंधुता मान्य नाही. आरएसएसच्या सरसंघचालकपदी आजपर्यंत एकही महिला झालेली नाही असेही सपकाळ म्हणाले.

या कार्यक्रमाला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ऑनलाईन संबोधित केले, यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच सर्वात मोठा अडथळा आहे. मोदी यांनी शकुनी चाल खेळून महिला आरक्षणाची ढाल बनवली व त्याआडून मतदारसंघ पुर्नरचनेचे विधेयक आणले. २०२३ साली संसदेत महिला आरक्षण सर्व संमतीने पास करण्यात आले पण मोदी सरकारने त्यात दोन अटी टाकल्या व आता एप्रिल २०२६ मध्ये महिला आरक्षणाच्या नावाने विशेष अधिवेशन बोलावले परंतु सरकारने डिलिमिटेशनचे विधेयक मांडले. हे विधेयक देशाची एकता व अखंडता नष्ट करणारे आहे म्हणून त्याला विरोध करण्यात आला. भाजपा सरकार मात्र विरोध पक्षांना महिला विरोधी ठरवत आहे पण भाजपाने देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नये, असे सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या भारती शर्मा यावेळी म्हणाल्या की, राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आज देशात या आरक्षणामुळे तब्बल १४.५ लाख महिलांना विविध पदावर संधी मिळालेली आहे, ही संधी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. हे महिला आरक्षण मिळाले पण अडथळे काही कमी झाले नाहीत. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक संसदेत अनेकवेळा मांडले पण ते मंजूर होऊ शकले नाही. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद व विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक राज्यसभेत पास करण्यात आले पण लोकसभेत बहुमताअभावी ते पास होऊ शकले नाही. २०१४ साली भाजपाचे बहुतमाचे सरकार आले पण हे विधेयक २०२३ मध्ये आणले व सर्व पक्षांच्या पाठिंब्याने ते मंजूरही झाले खरे पण डिलिमिटेशन करून लोकसभेच्या जागा वाढवून त्यातून महिलांना आरक्षण देण्याची भाजपा सरकारची भूमिका आहे पण सध्या असलेल्या ५४३ जागांमधून महिलांना आरक्षण द्या, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला ‘अजित पवार’ यांचे नाव? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made a big statement regarding womens reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
3

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.