Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुंबईतून केरळला जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमिन पटेल व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 05:21 PM
मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशातील चार राज्ये व एका केंद्रशासीत प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत असून ९ तारखेला केरळमध्ये मतदान होत आहे. मुंबईतील केरळचे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज आपल्या गृहराज्यात रवाना झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुंबईतून केरळला जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमिन पटेल व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, निवडणुका लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाही पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. केरळचे जे लोक रोजीरोटीसाठी मुंबईत आहेत ते आज केरळला जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. मतदानाच्या दिवशी अनेक लोक सुट्टी समजून मतदानाला न जाता बाहेरगावी पर्यटनाला, सहलीला जातात पण केरळचे नागरिक जेथे काम करतात तेथून निवडणुकीच्या वेळी आपल्या राज्यात जातात. वोटचोरीमुळे निवडणूक प्रक्रिया डागाळलेली आहे, पैसा फेक तमाशा देख, असे चित्र असताना मतदानासाठी आपल्या राज्यात जाणे ही अत्यंत चांगली घटना आहे. १०० टक्के मतदान कसे होईल, यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. केरळचा माणूस कामासाठी दुसऱ्या राज्यात जातो पण मतदानाला मात्र आवर्जून आपल्या राज्यात जातो. आखाती देशातील युद्धामुळे अनेक केरळी नागरिक अडकून पडले आहेत, त्यांना मतदानात सहभागी होता येत नाही त्याची हळहळ आहे, असेही सपकाळ म्हणाले.

बारामतीच्या पोटनिवडणुकीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीवरून कोणताही वाद नाही. लोकशाहीच्या उत्सवात सुचिते अनुसार कोणी पुढे जात असेल तर त्यात वावगे काय, असे सपकाळ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानावर बोलणे मात्र सपकाळ यांनी टाळले.

हे सुद्धा वाचा : मिळकतकरावरील दंड एक टक्क करा, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा स्थायी समितीला प्रस्ताव; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारी उर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावलेली असतानाच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आता काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला आहे, त्यामुळे बारामतीमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बुहजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. आकाश विजयराव मोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made an important appeal to voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Keral News

संबंधित बातम्या

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
1

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ
2

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
3

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
4

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.