Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना…; काँग्रेसचा आरोप

भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टिम’ भाजपाला हवी आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 04, 2026 | 05:36 PM
भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना...; काँग्रेसचा आरोप

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना...; काँग्रेसचा आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टिम’ भाजपाला हवी आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या सध्या सुरु असलेल्या निवडणुकीचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, हा मर्यादीत मतदार असतो. पण या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’, चा खेळ खुलेआमपणे सुरु आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी सत्ताधारी भाजपा महायुतीने सत्ता, पैसा या सर्व तंत्राचा गैरवापर केला आहे. घातपात, विश्वासघात, पैशाचे प्रचंड वाटप करण्यात आले आहे. या निवडणुकीला सत्ताधारी महायुती अत्यंत विकृत पद्धतीने सामोरे जात आहे, हे चित्र लोकशाहीसाठी अजिबात चांगले नाही.

निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असतात, त्या निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या पाहिजेत पण भाजपाची सत्तेची राक्षसी हाव वाढली आहे आणि यातूनच मदमस्तपणाही वाढलेला दिसत आहे, त्याचेच पडसाद विधान परिषद निवडणुकीतही उमटले आहेत. भाजपाने निवडणुकीत घोडेबाजार केला असून हे लोकशाहीसाठी काळे पर्व आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपा व निवडणूक आयोगाची अभद्र युती आहे. मविआची सदस्य संख्या कमी असली तरी त्याचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित करून १९८४ साली भाजपाचे लोकसभेत दोनच खासदार निवडून आले होते, त्यावेळी कोणी सदस्य संख्येबद्दल बोलले नव्हते. भाजपाची सदस्य संख्येवरची भाषा ही लोकशाही गुंडाळून ठेवायची मानसिकता दाखवते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल…

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made serious allegations against bjp 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
2

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
3

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
4

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.