Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा; हर्षवर्धन सपकाळांची टीका

भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2025 | 12:47 PM
सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा; हर्षवर्धन सपकाळांची टीका

सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र मला रमी खेळताच येत नाही, काही जणांनी विनाकारण माझी बदनामी केली, असा आरोप करत कोकाटे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसंच यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरुन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे व त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, हे सरकार लोकशाही माननारे नाही तर हम करे सो कायदा पद्धतीने काम करत आहे. एका मंत्र्यांच्या घरात पैशाने भरलेली बॅग सापडते, दुसरा मंत्री विधानसभेत रमी खेळतो तर गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावाने खुलेआमपणे डान्सबार सुर आहे. अशा मंत्र्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. महिला असुरक्षित आहेत, महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग आणून त्याचा काळा धंदा जोरात सुरु आहे, तरुण पिढीला नशेखोरीत ढकलले जात आहे. आका, कोयता गँग बिनधास्त धुडगुस घालत आहेत, अवैध धंद्यांचे पीक जोमात सुरु आहेत. कोणालाही पोलीसांचा धाक राहिलेला नाही. ही गुंडगिरी, मवाली संस्कृती आणण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असं सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. महाराष्ट्राची ती राजकीय संस्कृती आहे. राज्यात विरोधकांना शत्रू मानत नाहीत, वैचारिक मतभेद असतात व विचाराची लढाई विचाराने लढली जाते, त्यामुळे या शुभेच्छातून काही राजकीय समिकरण बदलेल असे वाटत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has strongly criticized the bjp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!
1

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ
2

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ

बिबट्यांच्या दहशतीने शिरूर तालुका थरथरला, अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
3

बिबट्यांच्या दहशतीने शिरूर तालुका थरथरला, अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

मतदारयादीतील गोंधळामुळे माळेगावात संतापाची लाट; मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतरच परिस्थिती नियंत्रणात
4

मतदारयादीतील गोंधळामुळे माळेगावात संतापाची लाट; मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतरच परिस्थिती नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.