Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरुन नवा वाद; काँग्रेसने दिला ‘हा’ गंभीर इशारा

बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2025 | 04:45 PM
बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरुन नवा वाद; काँग्रेसने दिला 'हा' गंभीर इशारा

बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरुन नवा वाद; काँग्रेसने दिला 'हा' गंभीर इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बबनराव लोणीकर व भाजपाचा समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे. एक भाषा, एक धर्म, एक नेता हा त्यांचा हट्ट आहे आणि आम्हीच सर्वकाही आहोत हा दर्शवणारा घृणास्पद प्रकार आहे. जनतेच्या मतातून सरकार स्थापन होते व जनतेच्या पैशातूनच योजना राबिवल्या जातात. सरकार शेतकऱ्यांना काही देते म्हणजे उपकार करत नाही. नरेंद्र मोदीच सर्व देतात हा लोणीकर सारख्या लोकांचा भ्रम आहे. शेतकऱ्याचा बाप काढणे हा संतापजनक प्रकार आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनेही आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणून अपमान केला होता असेही सपकाळ म्हणाले.

दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्याने शक्तीपीठाचा घाट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाचा घाट दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्यावर घातला आहे. लाडक्या उद्योगपतींना त्यांचा कच्चा माल विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून गोव्यातील बंदरापर्यंत एक कॉरिडोर हवा आहे, त्यांच्यासाठी हा रेड कारपेट घातला जात आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास पैस नाहीत, ठेकेदाराला देण्यास पैसे नाहीत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. हा खर्च १.५ लाख कोटी पर्यंत जाईल व त्यातून मलिदा खाण्यासाठी हे सर्व सुरु आहेत. महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाण्याची ही सुरुवात आहे. भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्यासाठी नाही तर मुठभर उद्योगपतींसाठी आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस पक्ष हिंदी सक्तीच्या विरोधात

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, हिंदी सक्तीच्या विरोधात काही संघटना काम करत आहेत, सरकार विरोधात आंदोलन करण्याचा त्यांनी प्रस्तावही दिला असून मराठी भाषेसाठी जी आंदोलने, मोर्चे काढले जातील त्यात काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा विषय पक्षाचा नसून महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा व संस्कृतीचा आहे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned against babanrao lonikars statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • babanrao lonikar
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

मुंबईतील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल; पोलिसांकडून कसून तपासणी सुरु
1

मुंबईतील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल; पोलिसांकडून कसून तपासणी सुरु

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार
2

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार

फाईलवर सही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का? शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसचा सवाल
3

फाईलवर सही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का? शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसचा सवाल

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन…
4

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.