Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 04:27 PM
भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर...; सपकाळांचा इशारा

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर...; सपकाळांचा इशारा

Follow Us
Follow Us:

नांदेड : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतमालाचे भाव सातत्याने पडत आहेत. मोदींनी अमेरिकेपुढे लोटांगन घालून स्वाभिमान गहाण ठेवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे सांगतील तेच काम नरेंद्र मोदी करत आहेत. शेतकरी, तरुणांच्या प्रश्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणंघेणं नाही. झोपे गेलेल्यांना जागे करने सोपे आहे, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी मात्र आसूड हाती घ्यावा लागतो, म्हणून शेतकरी विरोधी भाजपा सरकारविरोधात आसूड मोर्चा काढण्यात आला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार रविंद्र चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, नांदेड शहर अध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, पप्पू पाटील कोंडेकर, बालाजी गाडे पाटील, प्रदेश सचिव श्रवण रापनवाड, धनराज राठोड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली भरमसाठ आश्वासने दिली, शेतमालाला दिडपट भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, १०० स्मार्ट सीटी निर्माण करणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, पेट्रोल-डिझेल ४० रुपये लिटर तर गॅस सिलेंडर ४०० रुपयांना देणार, पण सत्तेत आले आणि मोदी सर्व विसरले. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करु म्हणणारा भाजपा आता ७/१२ वरून शेतकऱ्यांचे नाव कोरे करून अदानी-अंबानीच्या नावे करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज नसताना शक्तीपीठ मार्ग केला जात आहे, तो शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यासाठी आहे.

दुसरीकडे तरुणांकडे डिग्री आहे पण नोकरी नाही, पेपरफुटी दरवर्षी होत आहे. लाडक्या बहिणांचा विश्वासघात केला आहे, २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले पण १५०० रुपये देतानाही ८० लाख लाडक्या बहिणांना योजनेतून वगळले आहे. भाजपा महायुतीने लाडक्या बहिणांना फसवले, तरुणांना फसवले आणि शेतकऱ्यांनाही फसवले आहे. इंधनाचे दर १०० रुपयाच्या वर गेले, गॅस सिलेंडर १००० रुपयांच्या वर गेला. जिवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या पण शेतमालाच्या किमती मात्र वाढल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाक करताना तेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, सोने खरेदी करु नका असे आवाहन केले पण स्वतः मात्र विदेश वाऱ्या करत फिरत आहेत. मुठभर उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केली पण सर्वसामान्य जनतेला मात्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. मोदींचे सरकार हे बहुजन समाज, गरिब, शेतकरी यांच्यासाठी नाही तर अदानी व अंबानीसाठीच काम करत आहे, असे सपकाळ म्हणाले. मोदी सरकार लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत आहे, पण लोकशाही व संविधानाशी खेळलात तर खबरदार, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

सपकाळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दैवी शक्ती आहे, असे त्यांचे लोक सांगतात पण त्यांची ही तथाकथित दैवीशक्ती शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, ही तथाकथित दैवी शक्ती फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी कामाला येत आहे, असा टोला लगावत, ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्ला’, असे सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned the bjp government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
1

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार
2

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

भाजपाची ‘वन नेशन, वन पार्टी’कडे वाटलाच, विधान परिषद निकाल म्हणजे ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार – हर्षवर्धन सपकाळ
3

भाजपाची ‘वन नेशन, वन पार्टी’कडे वाटलाच, विधान परिषद निकाल म्हणजे ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार – हर्षवर्धन सपकाळ

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल
4

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.